टोप (प्रतिनिधी) :  ग्रामपंचायत शिरोली (पुलाची), प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली, तलाठी कार्यालय शिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज (रविवार) मार्बल लाईन, सांगली फाटा, केएमटी पेट्रोल पंप येथे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचे रॅपिड अँटिजेंन टेस्ट मोहीम करण्यात आली.

यावेळी एकुण १५३ जणांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये १०० जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी ४ पॉझिटिव्ह आणि ९६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह. तसेच ५३ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

या मोहिमेत शिरोली सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, मंडल अधिकारी भरत जाधव,  गावकामगार तलाठी निलेश चौगुले, कोतवाल संदीप पुजारी, पोलिस कर्मचारी मेतके, लॅब टेक्निशन प्रीती कांबळे, आशा वर्कर अलका जाधव, सर्जेराव पाटील, हरीश वंडकर, नितीन परमाज, जयसिंग यादव यांनी सहभाग घेतला.