हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे आज (बुधवार) रामनवमी उत्सव पारंपरिक पद्धतीने, भक्तिभावात आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात गोंधळी यांनी रामजन्म कथा सांगितली. मानकरी गुरव यांनी धार्मिक विधी पार पाडले.

अतिग्रे गावात रामनवमी उत्सवाची मोठी परंपरा आहे. ग्रामदैवत हनुमान जागृत देवस्थान आहे. समर्थ रामदास स्वामींच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली आहे. प्रत्येक वर्षी रामनवमी उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३ दिवस चालणारे कार्यक्रम यात्रा कमिटीने रद्द केले. त्यामुळे आज या उत्सवासाठी गावातील प्रमुख मानकरी आणि मोजके भाविक उपस्थित होते.