कोल्हापूर ( प्रतिनिधी ) स्वाभिमानीचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर हजेरी लावत पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली होती. यावर प्रतिक्रीया देताना हातकणंगलेचे जिल्हा प्रमुख म्हणून तब्बल 19 वर्षे जबाबदारी पार पाडणाऱ्या मुरलीधर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई झाली. यानंतर आता राजू शेट्टी यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.

याबाबत बोलताना राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, मातोश्रीवर झालेली उद्धव ठाकरेंसोबतची बैठक अराजकीय होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागांवर आपलं लक्ष केंद्रित करेल.

मुरलीधर जाधव यांनी किमान माझी पत्रकार परिषद पाहायला हवी होती. ते माझे चांगले मित्र आहेत, त्यांची काय नाराजी आहे हे मला माहिती नाही. कदाचित शिवसेना पक्षातील हा अंतर्गत प्रश्न असू शकतो. अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

सध्य स्थितीला मुरलीधर जाधव यांनी शिवसेनेशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संगनमत या आशयाचे विधान केले होते. ते विधान केलं होतं ते आता निकालात निघाल आहे. मात्र यावेळी केलेल्या विधानावरुन पक्षाकडून झालेल्या कारवाईला मुरलीधर जाधव यांना सामोरं जावं लागलं आहे. उद्या दि. 5 जानेवारी रोजी जाधव पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे ते नेमकी काय भुमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.