कुरुंदवाड (प्रतिनिधी) : आलास (ता. शिरोळ) हद्दीत शिरोळ तालुका खरेदी विक्री पेट्रोल पंपासमोर झाडाखाली उघडयावर तीन पानी जुगार खेळताना कुरुंदवाड पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेवून अटक केली. त्यांच्याकडून ८ हजार ८००, एक मोबाईल हँडसेट, दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख ४३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल (शुक्रवार) सायंकाळी केली.

यामध्ये पोलिसांनी दिपक रमेश आंबी, संदीप श्रीकांत नाईक, बश्वेश्वर भीमा कांबळे, महादेव दिलीप कांबळे (सर्व रा. गणेशवाडी) आणि नितीन विनायक कांबळे (रा. कवठेगुलंद) यांना अटक केली आहे. अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत.