पुणे (प्रतिनिधी) :  विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मला देऊन आमचे नेते शरद पवारसाहेब माझ्या निष्ठेला निश्चितच न्याय देतील,  असा विश्वास केडीसीसी बँकेचे संचालक व शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य प्रताप उर्फ भैय्या माने यांनी आज (बुधवार) येथे व्यक्त केला. पुणे येथे पुणे पदवीधर मतदारसंघातून भैय्या माने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते बोलत होते.

भैय्या म्हणाले  की,  समाजकारण आणि शैक्षणिक कार्याचा वारसा सक्षमपणे पुढे चालवला आहे. गेल्या ४० वर्षांपासून सामाजिक कार्यात व सर्व घटकांना न्याय देत नेहमी अग्रेसर राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी नेहमी प्रयत्न करत आलो आहे. यांची नोंद घेऊन देशाचे नेते  शरद पवार  निश्चितच मला न्याय देतील.

यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील,  युवक प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, कोल्हापूर शहर अध्यक्ष आर. के. पोवार,  प्रदेश सरचिटणीस आदिल फरास, माजी स्थायी सभापती राजेश लाटकर,  सरचिटणीस अनिल साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे,  राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर जिल्हा अध्यक्ष अनिल घाटगे,  केडीसीसी बँक संचालक बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर आदी उपस्थित होते.