कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील शिवाजी चौकात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.

प्रभू श्रीरामांच्या फोटोचे पूजन करून रामनामाचा गजर करण्यात आला. शासनाच्या नियमांचे पालन करत परिसरात प्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी सेवाव्रत प्रतिष्ठानचे संभाजी उर्फ बंडा साळुंखे, नितेश कोकितकर, सनी पेंणकर, अजित पाटील, सागर साळुंखे, सुहास शिंदे, बजरंग दलाचे सिद्धार्थ कटकधोंड, अनिल कोडोलीकर, युवराज भोसले, क्षत्रिय मराठा रियासतचे प्रसाद मोहिते, सुनील पाटील, हिंदू एकताचे अनिल चोरगे, राजू गडकरी, अमित माळी उपस्थित होते.