मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता सुशांत सिंह राजपूत  मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. त्यानंतर अनेक बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेत्यांची एनसीबीकडून चौकशी देखील करण्यात आली. माहितीनुसार एनसीबीने प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांच्या घरावर सुद्धा ड्रग प्रकरणात छापेमारी केली आहे. या छापेमारीतून एनसीबीने काही प्रमाणात ड्रग्ज देखील जप्त केले आहेत.

या छापेमारीच्या ठिकाणी कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती दोघेही उपस्थित होते. या दोघांवरही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एनसीबीला या जोडप्याच्या ड्रग सेवनाबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत काही प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.