मुंबई ( वृत्तसंस्था ) आपल्या वादग्रस्त वक्तव्याने अनेकदा चर्चेत आलेले उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांनी राम मंदिर मुद्यावरुन रान उठवले असताना यातच खासदार राऊत यांनी ही भाजपला घेण्याचा प्रयत्न केला आहे.


याबाबत बोलताना खासदार राऊत यांनी भाजप राम मंदिराचा मुद्दा राजकारणाशी जोडत असल्याचा आरोप करत 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप भगवान राम यांना उमेदवार म्हणून घोषित करू शकते, असे त्यांनी उपहासात्मकपणे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया आली आहे.

संजय राऊत म्हणाले, “आता फक्त एकच गोष्ट उरली आहे की भाजप निवडणुकीत भगवान राम हेच उमेदवार असतील. रामाच्या नावावर राजकारण केले जात आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन हा भाजपचा कार्यक्रम आहे, राष्ट्रीय कार्यक्रम नाही, असे संजय राऊत यांनी यापूर्वी म्हटले होते.

त्यांना विचारण्यात आले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुतळा अभिषेक सोहळ्यात सहभागी होणार का ? याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे नक्कीच जातील पण भाजपचा कार्यक्रम संपल्यानंतर. भाजपच्या कार्यक्रमाला कोणी का जावे ? हा राष्ट्रीय कार्यक्रम नाही. भाजप या सोहळ्यासाठी भरघोस सभा घेऊन प्रचार करत आहे, पण त्यात पावित्र्य कुठे आहे ? असा ही उपासात्मक टोला त्यांनी लगावला.