दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारत – कॅनडा यांच्यात अनेक महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत आरोप केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले. भारत सरकारनेही भारतात उपस्थित असलेल्या अनेक कॅनेडियन मुत्सद्यांना देश सोडण्याचा अल्टिमेटम देऊन प्रत्युत्तर दिले.

दोन्ही देशा दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने कॅनडाला कडक संदेश दिला आहे. हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट 2023 (HTLS) मध्ये उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले की कॅनडाने हे संबंध बिघडवले आहेत आणि यामुळे भारताचे नाही तर कॅनडाचेच नुकसान होणार आहे.

या मुद्द्यावर पियुष गोयल यांनी स्पष्टपणे उत्तर दिले, “आम्ही कॅनडा सोबत कोणतीही चर्चा थांबवलेली नाही.” त्यांनी थांबवली आहे. त्यांच्या नेत्यांबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. या गैरसमजांना कोणताही आधार नसतो. यामुळे त्यांचे नुकसान होईल, भारताचे नाही. आमची बाजारपेठ वाढली आहे. आता त्याचा फटका कॅनडा आणि त्याच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे.” याशिवाय पीयूष गोयल म्हणाले की, यूकेसोबत आमची चर्चा सुरू आहे आणि चांगली सुरू आहे. असं ही ते म्हणाले.

भारत कॅनडा संबंध बिघडले

गेल्या काही वर्षांत कॅनडात खलिस्तानी हालचाली वाढल्या आहेत. अनेक खलिस्तानी समर्थकांनी कॅनडामध्ये वेळोवेळी खलिस्तान समर्थक निदर्शने केली आहेत. याबाबत जस्टिन ट्रुडो जी-20 दरम्यान भारतात आले होते, तेव्हा पंतप्रधान मोदींनीही हा मुद्दा संभाषणात उपस्थित केला होता आणि अतिशय कठोरपणे बोलले होते. नंतर सप्टेंबरमध्ये ट्रुडो यांनी संसदेत निवेदन देऊन खळबळ उडवून दिली.