कलकत्ता ( वृत्तसंस्था ) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. मतदानाचे पाच टप्पे पार पडले असून सहाव्या टप्प्याचे मतदान 25 मे रोजी होणार आहे. भाजप सातत्याने विजयाचा दावा करत आहे. त्याचवेळी, विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या INDIA आघाडीलाही आपल्या विजयाची खात्री वाटत आहे.

आरोप-प्रत्यारोप आणि वक्तव्यांचा फेरा सुरूच आहे. या सगळ्यामध्ये बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त पत्रकार परिषदेचे आव्हान दिले आहे. संयुक्त पत्रकार परिषदेची मागणी करत ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी मोदी बाबू सरांना विचारते आहे. कृपया या आणि जागा निश्चित करा. तुम्ही टेलीप्रॉम्प्टर देखील वापरू शकता. मी एकटी येईन. तुम्ही 10 अधिकारी आणू शकता आणि तुम्ही प्रश्न विचारण्यास तयार आहात का ?” मी तुम्हाला आव्हान देते.

एक दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमधील अनेक विभागांचा ओबीसी दर्जा रद्द केल्यावरून भाजपवर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या की, भाजपचे लोक त्यांच्या राज्याच्या धोरणांवर का बोलत नाहीत ? ज्या राज्यांमध्ये त्यांची सत्ता आहे, त्या राज्यांवरही चर्चा व्हायला हवी. ते म्हणाले, हे (ओबीसी आरक्षण) कॅबिनेट, विधानसभेत मंजूर झाले आणि त्यावर न्यायालयाचा निर्णयही आहे. भाजप निवडणुकीपूर्वी खेळत आहे. भाजप हे केवळ मतांचे राजकारण करण्यासाठी आणि एका दिवसासाठी करत आहे, जेणेकरून त्यांचा भ्रष्टाचार 5 वर्षे चालू राहील. असा ही आरोप त्यांनी केला.

https://www.youtube.com/watch?v=kzzDSK5bS70