कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्यासह माजी खासदार संभाजी राजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिता राजे, युवराज्ञी मधुरिमा राजे यांनी कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात निर्माण केला आहे.

युवराज मालोजीराजे यांनी मंगळवारी मोटरसायकलीवरून मंगळवार पेठेतील तालमी, मंदिरे, व्यापारी, उद्योजक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या घरी भेट देऊन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू छत्रपतींना विजयी आवाहन केले. यावेळी मंगळवार पेठेत मालोजीराजे यांनी प्रमुख कार्यकर्त्यां समावेत मोटरसायकलवरून प्रचार केला. यावेळी पाटाकडील तालीम मंडळाचे सचिव संदीप सरनाईक, राजू ढेरे यांच्या घरी भेट देऊन त्यांनी थेट कैलासगड स्वारी मंदिरातील शंभू महादेवाचे दर्शन घेतले.

त्यानंतर मालोजीराजे यांनी जेष्ठ फुटबॉलपटू निवृत्त पोलीस उपनिरीक्षक शरद माळी, पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष राजू ठोंबरे, ज्येष्ठ फुटबॉलपटू निवास जाधव, तुकाराम माळी तालमीचे शिवाजीराव पोवार ,अमर तरुण मंडळाचे दिलीप जाधव, प्रा. रवींद्र पायमल यांच्या घरी भेट दिली. घरोघरी मालोजीराजे यांचे स्वागत औक्षण करून करण्यात आले.

सायलेंट ग्रुपचे निलेश कोळी यांच्या घरी युवक आणि महिलांचा छोटा मेळावा झाला. यावेळी महिलांनी महागाईवर आणि लोकांनी बेरोजगारींवर टीका केली. माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, बांधकाम व्यावसायिक शेखर जाधव, ज्ञानदेव पाटील, गोशिमाचे अध्यक्ष दीपक चोरगे, बाळासाहेब निचिते, शशिकांत पवार, माजी फुटबॉलपटू शरद पवार यांच्या घरी भेट दिली.

शिवसेनेचे संपर्क नेते विजय देवणे, अभिषेक देवणे आणि संभाजी देवणे यांच्या घरी भेट देऊन कार्यकर्त्यांसमवेत प्रचाराच्या नियोजनावर चर्चा केली. देवणे यांच्या गल्लीतील दत्त मंदिरातही मालोजीराजे यांनी दर्शन घेतले. तत्पूर्वी अर्बन बँकेचे संचालक नंदकिशोर मकोटे यांच्या घरीही भेट दिली. यावेळी मालोजीराजे यांनी कोष्टी समाजातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.संपत जाधव यांच्या घरी भेट देऊन जेष्ठ फुटबॉलपटू दिवंगत पांडबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

प्रायव्हेट हायस्कूलजवळील आमदार जयश्री जाधव यांच्या कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांसमवेत चहापाणी केले. उद्योजक सत्यजित जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दीपक थोरात, शरद जाधव, सागर जाधव ,प्रकाश टिपूगडे, अनिल जाधव ,राजू आडके, संदीप चौगुले ,संदीप पोवार, आशिष पवार, शुभम शिरहट्टी, युवराज कुरणे, ऋषिकेश पवार, ओंकार पाटील ,संतोष आडूरकर, अमित पवार उपस्थित होते.

त्यानंतर मावळा ग्रुपचे उमेश पवार, कृष्णा ग्रुपचे दिलीप साळोखे, सराफ व्यापारी धोंडीराम शिंदे, पुंड क्लासचे प्रा. पुंड, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते विजयसिंह पाटील यांच्या घरी भेट देऊन चर्चा केली.

सुबराव गवळी तालीम मंडळ परिसरात मालोजीराजे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तालमीच्या इमारत बांधकामाची पाहणी केली. सुबराव गवळी तालमीचे आपले कायम ऋणानुबंध असून बांधकामाच्या कामात सरळ हाताने मदत केली जाईल असे आश्वासनही देण्यात आले.

यावेळी रामभाऊ पाटील, उदय पाटील, रमेश मोरे, संतोष महाडिक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिलिंद गुरव, संतोष महाडिक श्रीकांत माने प्रताप सिंह जाधव, फुटबॉल प्रशिक्षक अमित पवार ,राम गल्लीतील राहुल भोई, बापू काशीद, नंगीवली तालीम मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, बाबा जामदार यांच्या घरी भेट दिली मराठा महासंघाचे अध्यक्ष मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या घरी भेट देऊन निवडणुकी संदर्भात चर्चा केली.

बजाबराव माने तालीमला भेट देत संचालक मंडळाची चर्चा केली. यावेळी अर्बन बँकेचे संचालक संभाजीराव जगदाळे, शिवाजी ढवण, प्रसाद जाधव, चंद्रकांत चिले ,संतोष आंबुसकर, राजेंद्र पाटील, लेटेस्ट तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सणगर गल्ली बोडके तालमीचेमध्ये कार्यकर्त्यांची छोटी सभा झाली. यावेळी अशोक जाधव यांनी शाहू छत्रपती यांच्या घराण्यासाठी तालमीचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे उभे राहणार असून शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार, असे आश्वासन दिले.

यावेळी मालोजीराजे म्हणाले, कोल्हापूरच्या तालमींना मोठा इतिहास आहे. कोल्हापूरच्या तालमी माझ्या कर्मभूमी असून माझ्या राजकीय आणि सामाजिक कार्यात तालमींनी मोठी साथ दिली आहे.

सामाजिक कार्यकर्ते अशोक पवार यांच्या घरी भेट दिली. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी केशव पोवार आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी जिल्हा शिवसेनाप्रमुख विनायक साळोखे, मिरजकर तिकटी येथील संयुक्त मंगळवार पेठेचे अध्यक्ष बाबुराव चव्हाण वस्ताद यांच्या घरी ही भेट दिली. यावेळी बाबुराव चव्हाण, कुलदीप साळोखे, कुबेर मंडलिक, राजू साठे, आप्पासाहेब साळोखे, निवास शिंदे, रघु शिंदे उपस्थित होते.

बालगोपाल तालमीचे अध्यक्ष दिवंगत निवास साळोखे यांच्या घरी मालोजीराजे यांनी भेट घेऊन निवास यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. बालगोपाल तालीम मंडळाच्या नवीन इमारतीच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या मालोजीराजे यांचे तालमीत जंगी स्वागत झाले. तालमीचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी निवास शिंदे, राहुल चव्हाण, आनंद कुलकर्णी, आप्पा साळोखे, आनंदराव नरके, सुशांत पवार, संजय भोसले, सुशांत चव्हाण, इम्रान पठाण, महेश शिंदे, करण भांदिगिरे ,धनंजय घाटगे, प्रतीक पवार आदी उपस्थित होते.

शाहू छत्रपतींना विजयी करण्यासाठी बालगोपालचे कार्यकर्ते जिवाचे रान केले जाईल अशी भावना प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर मालोजीराजे यांनी माजी महापौर हसीना फरास यांच्या घरी भेट दिली. माजी नगरसेवक आदिल फरास यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वासिम फरास, काका फरास यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.