मुंबई/प्रतिनिधी : माजी पोलीस अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना लखनभैया एन्काऊंटर केस प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. 2006 च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

लखनभैया एन्काऊंटर केस प्रकरणात मुंबई हायकोर्टाने माजी पोलिस आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता रद्द  करत  2006 च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

नोव्हेंबर 2006 च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणातील 12 आरोपींना ट्रायल कोर्टाने ठोठावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. ट्रायल कोर्टाने 13 अन्य आरोपींना दोषी ठरवले होते आणि प्रदीप शर्माची निर्दोष मुक्तता केली होती.

परंतु हायकोर्टाने प्रदीप शर्माची निर्दोष सुटका रद्द केली आणि पुराव्याच्या मालिकेच्या आधारे त्याला दोषी ठरवले. एकूण 13 आरोपींना हायकोर्टाने दोषी ठरवले आहे. प्रदीप शर्मा हे अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातीलही आरोपी आहेत.