मुंबई (प्रतिनिधी) : बॉलीवूडमधील कलाकार विविध कारणांवरून नेहमीच चर्चेत असतात. त्यातील एक म्हणजे कंगना राणावत. कंगना रानावतला बॉलिवूडची परखड अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. पण हल्ली टी कही वादग्रस्त विधानांमुळे सारखी चर्चेत आहे. मुद्दा कोणताही असो, कंगना त्यावर भाष्य करणार. आता या कंगनाने एक वेगळीच इच्छा प्रकट केली आहे. दुर्गा देवीचे भव्य मंदिर बनवण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. कंगनाने यासंदर्भात एक ट्विट केले आणि तिच्या या ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या ट्विटसोबत तिने तिच्या कुलदैवताच्या मंदिराचा फोटोही शेअर केला.

तिने ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘माता दुर्गेने मला भव्य मंदिर बनवण्यासाठी निवडले आहे. जे आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी उभारले होते. माता दुर्गा इतकी कृपाळू आहे की, तिने हे घरही स्वीकारले. पण मला एकदिवस असे मंदिर बनवायचे आहे, जी तिची किर्ती आणि आपल्या महान संस्कृतीच्या तोडीचे असेन. जय माता दी,’ असे ट्विट कंगनाने केले आहे.