मुंबई ( वृत्तसंस्था ) देशभरात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची धूम सुरू आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याचे व मिझोराममध्ये संपूर्ण मतदान पार पडले. येत्या महिनाभरात मध्य प्रदेश, राजस्थान व तेलंगणामध्येही मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मदार जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रातही लवकरच विधानसभा व लोकसभा निवडणूका होणार आहेत. या निमित्ताने ”दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारात आज सहज काही लोकांशी बोलत होतो. महाराष्ट्राच्या बाबतीतले त्यांचे अंदाज ऐकून मला स्वत:लाच धक्का बसला.

त्यांचे म्हणणे आहे की, महाविकास आघाडीला 31 ते 33 जागा मिळतील आणि महायुती (भाजपा, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट) यांना 15 ते 17 जागा मिळतील. येणा-या काळात या 5 राज्यातील निवडणूकींचा परीणाम हा संपूर्ण देशभरात दिसू लागेल आणि ह्या 5 राज्यांचा त्यांचा अंदाज असा आहे की, 5 पैकी कमीत-कमी 4 राज्ये काँग्रेस जिंकेल. राहुल गांधींची जोरदार हवा आहे”, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.