कोल्हापूर (प्रतिनिधी) :  करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात इसवी सनाच्या बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख सापडला आहे.

संस्कृत भाषा, देवनागरी लिपीत, सोळा ओळी, गद्धेगाळी शिलालेख, साधारण २ फूट लांब व १ फूट रुंद, मूळ मंदिराचा भाग असलेला व नंतर दगडी बांधकामात आडवा दगड म्हणून याचा भिंतीकरिता वापर केला आहे, मंदिर परिसरातील सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाच्या पूर्व भिंतीत हा शिलालेख आडवा आहे. मंदिरातील संगमरवरी फरशी काढण्यासाठी सुरू केलेल्या संवर्धन प्रकल्पात हा शिलालेख उजेडात आला आहे. त्यामुळे करवीर निवासीनी श्री अंबाबाई मंदिरातील इतिहासात आणखीन एक मौल्यवान भर पडली आहे.