कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १७७६ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १६९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण १७ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ४०० तर करवीर तालुक्यात ३४६ रुग्ण आढळून आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र ४००, आजरा- ८३, भुदरगड- २९, चंदगड- १३, गडहिंग्लज- २७, गगनबावडा – ८, हातकणंगले – २३०, कागल- १०५करवीर- ३४६, पन्हाळा- १३१, राधानगरी- ५२, शाहूवाडी – ६८, शिरोळ – १२१, नगरपरिषद क्षेत्र- १३७, इतर जिल्हा व राज्यातील- २४ अशा १७७६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ६२, ९४३ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ४४, ०४४  

मृतांची संख्या, ८४२

उपचार सुरू असलेले रुग्ण१४, ०५७