कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात २८७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात  ७८५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९८७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज रात्री ८ वा.प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ७५, आजरा तालुक्यातील ३, भूदरगड तालुक्यातील १६, चंदगड तालुक्यातील ९, गडहिंग्लज तालुक्यातील ६, हातकणंगले तालुक्यातील ३९कागल तालुक्यातील  ४, करवीर तालुक्यातील २६, पन्हाळा तालुक्यातील ६, राधानगरी तालुक्यातील ४शाहूवाडी तालुक्यातील ३शिरोळ तालुक्यातील १४इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ६१ आणि इतर जिल्ह्यातील २१ अशा एकूण २८७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ७८५ जण कोरोनामुक्त झालेतं.

दरम्यान, करवीर तालुक्यातील सांगवडे येथील १, शिरोळ तालुक्यातील डोनोली १, कानवाड १, हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील १ आणि चिकोडी बेळगावमधील १ अशा ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४६,०१५.   

एकूण डिस्चार्ज ३७,२९३. 

उपचारासाठी दाखल रुग्ण ७२२०.

कोरोनामुळे एकूण मृत्यू १५०२ झाले आहेत.