आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यात आज १८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या बधितांपैकी आजरा शहरात फक्त १ जणच बाधित आढळला आहे. गेल्या महिनाभरात ही आकडेवारी सर्वाना समाधान देणारी ठरली आहे. तर तालुक्यातील झुलपेवाडी येथील ६७ वर्षीय वृद्धाचा काल रात्री मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या २० झाली आहे.
दरम्यान, तालुक्यातील इतर गावांमध्ये १७ बाधित असल्याने संख्या १८ झाली आहे. आजरा शहरात आज एकच ५८ वर्षीय पुरुष बाधित आढळला आहे. तर तालुक्यात सुलगाव, मडीलगे, चिमणे, दाभिल येथे प्रत्येकी २ बाधित आढळले आहेत. खोराटवाडी, साळगाव, वेळवट्टी, बुरुडे, वाटंगी, होणेवाडी, मुमेवाडी, लाटगाव, कोळिन्द्रे येथे प्रत्येकी १ बाधित आढळले आहेत.