नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सध्या गाझा तेथील लोकांना आश्रयाची नितांत आवश्यकता असून, शेजारील अनेक राष्ट्रांनी विस्थापितांना आश्रय दिल्यास ही समस्या तातडीने निकाली निघण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेजारील राष्ट्रांनी आश्रयासाठी सीमा खुल्या करण्याऐवजी या प्रकरणावर तोडगा काढण्याचा विचार केला पाहिजे. असे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी म्हटले आहे.


एल-सिसी यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, इजिप्तने लष्करी बळाद्वारे पॅलेस्टिनी प्रश्न सोडवण्याचा कोणताही प्रयत्न नाकारला आहे. आमचा ना लष्करी कारवाईवर विश्वास आहे ना पॅलेस्टिनींच्या विस्थापनावर. आम्हाला या परिसरात मोठ्या प्रमाणात विस्थापन नको आहे.

गझा लोकांचे इजिप्तमध्ये विस्थापन झाल्यास वेस्ट बँक-जॉर्डनसारखी समस्या निर्माण होईल. अशा परिस्थितीत गाझातील लोकांचे इजिप्तकडे विस्थापन होण्याच्या बाजूने आम्ही नाही असे ही त्यांनी म्हटले आहे.


इजिप्त रसदासाठी सीमा उघडण्यास तयार आहे

इजिप्शियन सरकार गाझातील लोकांना आश्रय देण्यास तयार नाही परंतु पुरवठा पोहोचवण्यासाठी सीमा उघडण्यास तयार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले की, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांनी गाझाला मानवतावादी मदत पाठवण्यासाठी 20 ट्रक रफाह सीमा ओलांडण्याची परवानगी दिली आहे. जेणेकरुन अडचणीत असलेल्या गाझा येथील लोकांना काही मदत मिळू शकेल.