रांगोळी (प्रतिनिधी) : हुपरी नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने उपनगराध्यक्ष पद रिक्त होते. त्यामुळे आज (सोमवार) सर्वानुमते ताराराणी पक्षाचे नगरसेवक गणेश वाइंगडे यांचा उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.

निवडीनंतर आमदार प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, अमित गाट यांच्या वतीने हुपरीतील जवाहर साखर कारखाना येथे वाइंगडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी हुपरीचे माजी उपसरपंच प्रकाश रणदिवे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

यावेळी ताराराणी पक्षाचे पक्षप्रतोद सुरज बेडगे, पं.स. सदस्य किरण कांबळे, प्रकाश जाधव, अमित गाट, सुभाष ससे, नाना पाटील, नगरसेवक रफिक मुल्ला,  प्रतापसिंह देसाई, अमेय जाधव, सिद्धू नायकवडे, उदय पाटील, राजेंद्र सुतार, बाळासाहेब रणदिवे, मनोहर सुतार, सुर्यकांत रावण, मनोज पाटील, राजेंद्र चिटणीस, नगरसेविका रेवती पाटील, शितल कांबळे, माया रावण, अनिता मुधाळे, प्रकाश बावचे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.