बेळगाव (प्रतिनिधी) : सन २०१७ ला महाराष्ट्र राज्य परिवहनच्या प्रत्येक बसवर “जय महाराष्ट्र” असे लिहीण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले त्या नुसार “जय महाराष्ट्र” लिहीलेली पहीली बस बेळगाव येथील कोल्हापुर बसस्थानकावर आली. त्यावेळी मदन बामणे, गणेश दड्डीकर, सुरज कणबरकर आणि इतर जणांवर भा.दं. वी १४३, १४७, १५३ अ, १४९ नुसार मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद नोंद झाली.

या प्रकरणात जेएमएफसी द्वितीय न्यायालयात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज मदन बामणे, गणेश दड्डीकर व सुरज कणबरकर यांची जामीनावर मुक्तता केली.

तसेच १ नोव्हेंबर २०१८ साली रत्नप्रसाद पवार, रमेश हिरोजी, सुरज कणबरकर आणि इतर जणांवर घोड्यावर बसुन बंदूक घेऊन मिरवणुकीत सामील झाले म्हणून मार्केट पोलीस स्थानकात त्याच्यांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी समितीच्या रत्नप्रसाद पवार यांची तूलना कर्नाटकातील कन्नड संघटनानी शोलेतील गब्बरशी केली होती.

या केसमध्ये आज जेएमएफसी द्वितीय न्यायालयात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुरज कणबरकर यांना जामीन मंजूर केला. या दोन्ही केसमध्ये अॅड. महेश बिजे, अॅड. एम बी. बोंद्रे, बाळासाहेब कागणकर, अॅड वैभव कुट्रे हे काम पहात आहेत.