धामोड (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यामार्फत ‘प्रशासन शेतकरी बांधावर’ही मोहीम राबविण्यात आली आहे. याची सुरुवात राधानगरी तालुक्यातील धामोड आणि आसपासच्या वाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून केली.

धामोड पैकी जाधववाडी येथील शेतकरी भिकाजी दादू जाधव यांच्या शेतात आधुनिक पध्दतीने उस शेती आणि येणाऱ्या अडचणी यावरती कारखाना संचालक अमल महाडीक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी  नवीन बेणे प्लॉट बरोबरच नियमितपणे उस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना खते आणि किटकनाशके उपलब्ध करून दिली जातील, असे आश्वासन दिले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव पाटील, संचालक दिलीप पाटील. धामोडचे डे. सरपंच सुभाष गुरव, सदाशिव कोरे, शेती विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.