मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विवेक ( वय ५९) यांचे आज (शनिवार) पहाटे कार्डिअ‍ॅक अरेस्टचा अटॅक येऊन  निधन झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांच्या निधनामुळे  सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

तमिळ सिनेसृष्टीत सुपरस्टार अशी ओळख असलेले अभिनेते विवेक यांनी अबु सांगिर, केलादी कम्मानी, तंबी पोंटाडी, तमिळ पोन्नू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. रजनीकांत यांच्या ‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली.  विवेक यांचा जन्म तमिळनाडूतील एका गरीब कुटुंबात झाला. पहिल्यापासून अभिनयाची आवड असल्यामुळे ते  शाळेतील स्पर्धांमध्ये भाग घेत.  त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचे ठरवले.