कॉफी हे पेय सर्वांचं आवडत पेय म्हणलं की हरकत नाही. लहानगा असो किंव्हा मोठी लोक असो, सकाळ असो किंव्हा रात्र सगळ्यांना कॉफी पिण्यास आवडते. दुधाची कॉफी असो किव्हा ब्लॅक कॉफी सगळ्यांना आवडते कॉफी पियायला. काही लोक ऑफिसमध्ये फ्रेश राहण्यासाठी सुद्धा सतत कॉफी पितात. पण तुम्हाला माहिती आहे का हि कॉफी जितकी चवीला छान लागते, तितकीच आरोग्याला हानिकारक आहे. विशेषतः उहाळ्यामध्ये पिल्याने आरोग्याला सुद्धा बेतू शकते. चला जाणून घेऊया त्यांचे नुकसान काय आहेत ते..

कॉफी पिण्याचे तोटे

डिहायड्रेशन

कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफिन आढळल्यास शरीराचे तापमान वाढू शकते, ज्यामुळे घाम येण्याचे प्रमाण वाढू शकते आणि शरीरातील निर्जलीकरण होऊ शकते. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. डिहायड्रेशन ही उन्हाळ्यातील सामान्य समस्यांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत कॉफी टाळावी आणि जास्तीत जास्त पाणी प्यावे.

शरीराचे तापमान वाढते

कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे तापमान वाढू शकते, ज्यामुळे उन्हाळा अधिक असह्य होऊ शकतो. यामुळे, जास्त घाम येण्याची समस्या असू शकते, ज्यामुळे थकवा आणि चक्कर येऊ शकते. कॉफी प्यायल्याने तुम्हाला उन्हाळ्यात मळमळ यासारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.

झोपेचा अभाव

बरेच लोक रात्री उशिरापर्यंत काम करण्यासाठी कॉफी पितात, पण ती तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगली नसते. कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन असते. यामुळे, रात्रीच्या वेळी तुमच्या झोपेची गुणवत्ता बिघडते, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ आणि थकल्यासारखे होऊ शकता.