चंदगड (प्रतिनिधी) : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने कोरोनाच्या काळात शासनाच्या खांद्याला खांदा लावून स्वताच्या जिवाची पर्वा न करता काम केलेल्या आरोग्य सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, महावितरण कर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचाऱ्यांचा इब्राहिमपूर (ता. चंदगड) येथे कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

यावेळी चेकपोस्ट, क्वारंटाईन केंद्रे, गावांतील घरोघरी जाऊन तपासणी करणे, आरोग्य केंद्रांवरील ड्युटी या सारख्या विविध कार्याच्या माध्यमातून सामाजिक हित जोपासन्याच काम या फ्रटंलाइन वारियर्सच्या माध्यमातून होत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून अशा लोकांना प्रोत्साहन मिळावे या उद्धेशाने महासंघाच्यावतीने कार्यक्रम राबविले जात आहेत.

इब्राहिमपूर येथील अशाच कोविड योद्धांचा सन्मान महासंघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी शिल्पा मांग (आशा सेविका), रेश्मा भातकांडे (अंगणवाडी सेविका), अनंत कदम (ग्रा.पं. कर्मचारी), विद्या पोवार (अंगणवाडी मदतनीस), लता घुरे (अंगणवाडी मदतनीस), सखुबाई ओवूळकर(अंगणवाडी सेविका), मनिषा गुरव (आशा सेविका), सागर कांबळे (सफाई कामगार) यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच विजयसिंह देसाई, माजी तंटामुक्ती अध्यक्ष वसंत देसाई, कोल्हापूर जिल्हा गटसचिव संघटनेचे उपाध्यक्ष विलास नार्वेकर, सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजी हरेर यांच्यासह रामचंद्र मगर,श्रीकांत शिरोळकर, रावजी देसाई,रमेश नार्वेकर, ग्रामस्थ उपस्थित होते.