कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकार सातत्याने उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आता कृषी व कामगार कायदे आणून मोदी सरकार शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. या विरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने देशव्यापी लढाई सुरु केली आहे.

महाराष्ट्रातही राज्याचे प्रभारी एच. के. पाटील व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. यावेळी, शेतकरी बचाओ रॅली व्हर्चुअल सभेचे माध्यमातून राज्याच्या सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कृषी राज्यमं विश्वजीत कदम यांच्या समवेत कोल्हापूरहून या शेतकरी बचाओ रॅली व्हर्च्युअल रॅलीमध्ये सहभाग घेऊन जिल्ह्यातील तसेच राज्यातील शेतकरी बांधवांशी संवाद साधला.

यावेळी नाम. सतेज पाटील ,आम. पी एन पाटील, आम. ऋतुराज पाटील, राजू आवळे. जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील, महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.