कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझे कुटुंब…माझी जबाबदारी या योजनेंतर्गत आज (शनिवार) महालक्ष्मी नवरात्र उत्सव कमिटी (तामजाई कॉलनी, रिंगरोड) यांच्यामार्फत नवरात्रोत्सवाचा खर्चाला फाटा देऊन मास्क, सॅनिटायझर, फिनेल, साबण, हायड्रोक्लोराईड या वस्तू फुलेवाड़ी कोविड केंद्राला प्रदान करण्यात आल्या.
महालक्ष्मी नवरात्र उत्सव कमिटी यांच्या मार्फत मंडळामार्फत दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खर्चाला फाटा देत अध्यक्ष किरण पाटील यांनी आवश्यक वस्तू फुलेवाडी कोविड केंद्राला प्रदान करण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार या केंद्राला महापालिकेचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझर, फिनेल, साबण, हायड्रोक्लोराईड या वस्तू प्रदान करण्यात आल्या.
या वेळी नगरसेविका रीना कांबळे, प्रा. शि. बँकेचे व्हा. चेअरमन बाजीराव कांबळे, डी. डी. पाटील, एस. एस. कांबळे, डॉ. सुनिल नाळे, अर्जुन पाटील, संदीप मगदूम, महादेव माळी, जितेंद्र कांबळे, राहुल पाटील, आझाद कुलकर्णी, शाहीद मोमीन, सुशांत भगत, शारदा पाटील, संजय वणकुद्रे, मीनाक्षी परीट, वैशाली पाटील, आशावर्कर, परिचारिका तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.