सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं अर्णबला जामीन मंजूर करण्याचे कारण…

मुंबई (प्रतिनिधी) : इंटीरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुसुम यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ११ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला होता.… Continue reading सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं अर्णबला जामीन मंजूर करण्याचे कारण…

आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनलॉक – ५ अंतर्गत देशात विविध नियम लागू करून अनेक प्रकारच्या सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये ही सेवा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र… Continue reading आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय…

हरियाणात कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनाला आज (गुरूवार) हिंसक वळण लागले. हरियाणाच्या सीमेवर पोलिसांनी रोखल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स फेकून देऊन पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले.     दिल्लीमध्ये आंदोलक घसू नये, यासाठी आज सकाळी अंबाला-पटियाला सीमेवर पोलीस, आरएएफच्या तुकड्यांचा मोठा फौजफाटा तैनात केला… Continue reading हरियाणात कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण

कोरोना लसीची चाहूल लागताच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ..?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना काळात १५ वर्षांपेक्षा कमी किंमतीवर गेलेले कच्च्या तेलाचे दर आता कोरोना लस येण्याची चाहूल लागताच कमालीचे वाढू लागले आहेत. २०२१ मध्ये ओपेक देशांचे लक्ष्य काय असेल हे ठरविण्यासाठी ३० नोव्हेंबर, १ डिसेंबरला बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर ४० वरून ४५ डॉलरवर पोहोचले आहेत. याचाच परिणाम गेल्या आठवडाभरापासून… Continue reading कोरोना लसीची चाहूल लागताच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ..?

अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे निधन

कोलकता (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी (वय ८५) यांचे रूग्णालयात  उपचार सुरू असताना आज (रविवारी) दुपारी १२.१५ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीला  धक्का बसला असून  सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. चटर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याने  ६ ऑक्टोबर रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले होते. मात्र,… Continue reading अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे निधन

महाराष्ट्रासह सहा नुकसानग्रस्त राज्यांना केंद्र सरकारकडून निधी…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनांमुळे नुकसान सोसावे लागलेल्या महाराष्ट्रासह सहा राज्यांना ४३८१.८८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि सिक्किम या राज्यांचाही समावेश आहे. यावर्षी चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनामुळे अनेक राज्यांमध्ये मोठं नुकसान झालं होतं.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा… Continue reading महाराष्ट्रासह सहा नुकसानग्रस्त राज्यांना केंद्र सरकारकडून निधी…

सलग तीन दिवस बँका बंद..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळीनिमित्त राष्ट्रीयकृत बँका उद्या (शनिवार) पासून तीन दिवस बंद राहणार आहेत. शनिवार, रविवार, सोमवार असे सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असेल. या कालावधीत ज्यांना पैशाची गरज आहे, त्यांना एटीएमला जावे लागणार आहे. इतर बँक कामकाज असलेल्यांची गैरसोय होणार आहे. दिवाळीला सुरूवात झाली आहे. यंदा दिवाळीत शनिवार, रविवारी आल्याने सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि… Continue reading सलग तीन दिवस बँका बंद..

धक्कादायक : सुशांतसिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या

धर्मशाला (वृत्तसंस्था) : बॉलीवूडसाठी हे वर्ष अत्यंत निराशाजनक ठरले आहे. इरफान खान, ऋषी कपूर या गुणी अभिनेत्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला तर उमदा अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली. सुशांतसिंगबरोबर ‘कैपोचे’ चित्रपटात काम केलेल्या आसिफ बसरा या अभिनेत्याने आज (गुरुवार) आत्महत्या केली. ते ५३ वर्षांचे होते. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धर्मशाला येथील मॅकलॉडगंजमधील जोगीबाडा रोडवरील कॅफेजवळ असलेल्या घरात… Continue reading धक्कादायक : सुशांतसिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या

‘ती’ जीमेल अकाऊंट बंद होणार… : गुगलचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल आता कस्टमर अकौंटसाठी नवीन धोरण अमलात आणणार आहे. त्यानुसार ज्यांचे जीमेल अकौंट दोन वर्षे निष्क्रिय असेल ते बंद करण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी १ जून २०२१ पासून होणार आहे. अर्थात याबाबत पूर्वसूचना दिली जाईल असून गुगलने हे धोरण अमलात आणण्यासाठी तयारी केली आहे. दोन वर्षांपासून एखाद्याचे जीमेल (Gmail), ड्राइव्ह (Google… Continue reading ‘ती’ जीमेल अकाऊंट बंद होणार… : गुगलचा इशारा

‘त्या’मुळेच साखर कामगार महिनाअखेरीस संपावर : कामगार युनियनचा इशारा

सांगली (प्रतिनिधी) : पगारवाढ व सातवा वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातले साखर कामगार ३० नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. दीड लाख साखर कामगार या आंदोलनात उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला. आज (शनिवार) सांगलीमध्ये झालेल्या राज्याच्या कामगार युनियनच्या कार्यकारिणीच्या बैठकीस हा निर्णय घेण्यात आला.   चौदा महिन्यांपासून राज्यातल्या साखर कामगारांचे करार प्रलंबित आहेत. राज्य सरकार आणि… Continue reading ‘त्या’मुळेच साखर कामगार महिनाअखेरीस संपावर : कामगार युनियनचा इशारा

error: Content is protected !!