नव्या आयुक्तांचा कारवाईचा दणका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या नवे आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे सक्रिय प्रशासकीय कामकाजात सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी रविवारी विनामास्क फिरणाऱ्या ३५ जणांवर कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या या कारवाईच्या दणक्याने प्रशासकीय यंत्रणाही हलली आहे. रंकाळा चौपाटी परिसरात स्वच्छता मोहिमेच्या काळात कोरोना प्रतिबंधक उपायोजनावरही भर देण्यात आले. सकाळी विनामास्क फिरणाऱ्या ३५ जणांवर महापालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करुन ३ हजार… Continue reading नव्या आयुक्तांचा कारवाईचा दणका

किल्लारी भूकंपावेळी खचला नाहीत, आता या संकटानं खचू नका : शरद पवार

मुंबई (प्रतिनिधी) : किल्लारी भूकंपावेळी खचला नाहीत. तेव्हा आता या संकटानं खचून जाऊ नका असं  आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांना केल. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळ सर्वाधिक फटका हा बळीराजाला बसला आहे. ऐन कापणीला आलेली पिक उध्वस्त झाल्यामुळं जगावं ती मरावं असाच प्रश्न या पोशिंद्यापुढ उभा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर पवार आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर… Continue reading किल्लारी भूकंपावेळी खचला नाहीत, आता या संकटानं खचू नका : शरद पवार

प्रसंगी कर्ज काढू, पण बळीराजाला जगवू..! : नामदार मुश्रीफ

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आधीच कोरोनाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे. त्यासाठी प्रसंगी कर्ज काढू पण बळीराजाला जगवू अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथे दिली. ते पंचायत समितीत झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. अजूनही… Continue reading प्रसंगी कर्ज काढू, पण बळीराजाला जगवू..! : नामदार मुश्रीफ

बेले येथील युवकाच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील बेले येथे जागेच्या वादाच्या कारणातून धनाजी सदाशिव कारंडे (वय ३२) याचा डोक्यात बांबू मारून खून केल्याप्रकरणी दोघांना न्यायालयाने जन्मठेपेसह वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विजय दिनकर कारंडे (वय ४०) राजेंद्र कारंडे (वय ३७, दोघेही रा. बेले) अशी त्यांची नावे आहेत. बेले येथील धनाजी कारंडे याने दोन वर्षांपूर्वी घराचे… Continue reading बेले येथील युवकाच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी ‘हात धुवा’ मोहिम यशस्वी करावी – डॉ.कादंबरी बलकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हात धुवा मोहिमेला अनन्यसाधारण महत्व असून कोरोनासह अन्य आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी हात धुवा मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज येथे बोलतांना केले. १५ ऑक्टोंबर हा जागतिक हात धुवा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे, हात धुवा दिवसाच्या निमित्ताने कोल्हापूर महानगरपालिका व सुलभ… Continue reading आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी ‘हात धुवा’ मोहिम यशस्वी करावी – डॉ.कादंबरी बलकवडे

पंढरपूर आलेल्या महापुर मदत कार्यासाठी व्हाईट आर्मी रवाना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्र व इतरत्र अचानक उद्भवलेल्या प्रचंड मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. यामुळे पंढरपूर शहरातील भीमा नदीकाठच्या परिसरांमध्ये व तसेच पंढरपुरात तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती ती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थलांतरित… Continue reading पंढरपूर आलेल्या महापुर मदत कार्यासाठी व्हाईट आर्मी रवाना

कॉग्रेसतर्फे व्हर्च्युअल सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकार सातत्याने उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आता कृषी व कामगार कायदे आणून मोदी सरकार शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. या विरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने देशव्यापी लढाई सुरु केली आहे. महाराष्ट्रातही राज्याचे प्रभारी एच.… Continue reading कॉग्रेसतर्फे व्हर्च्युअल सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद  

सध्याच्या मुसळधार पावसामागे ‘हे’ आहे कारण !

सध्या सोशल मीडियावर एक मेसेज फिरतोय. ‘एक चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण झालंय. ते भारताचा भूभाग ओलांडून अरबी समुद्रात जाणार आहे, तेसुद्धा कर्जत-जामखेडमार्गे. त्याच्यामुळे मोठा धोका आहे, वगैरे, वगैरे…’ याबाबत लोकांमध्ये काहीसं कुतूहल, गैरसमज आणि भीतीसुद्धा आहे. हे सारं दूर करणं आवश्यक आहे. त्यासाठीच ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांचा हा खास लेख… देशातून मान्सूनच्या परतीचा… Continue reading सध्याच्या मुसळधार पावसामागे ‘हे’ आहे कारण !

भाटणवाडी येथे वडीलांच्या उत्तरकार्यादिवशी केले वृक्षांचे वाटप

सावरवाडी (प्रतिनिधी) : पर्यावरण संतुलन आणि वृक्षांचे महत्त्व नव्या पिढीत रुजावे या भावनेतून कोरोनाच्या काळात करवीर तालुक्यातील भाटणवाडी गावात वडीलांच्या उत्तरकार्यादिवशीच वडीलांची आठवण रहावी म्हणून वृक्षाचे वाटप  करण्यात आले. गावातील  पांडुरंग महादेव पाटील यांचे नुकतेच वयाच्या ८५ वर्षी निधन झाले. वडीलांच्या उत्तरकार्यादिवशीच त्यांच्या स्मरणार्थ झाडे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. सुभाष पांडुरंग पाटील, कृष्णात पांडुरंग पाटील,… Continue reading भाटणवाडी येथे वडीलांच्या उत्तरकार्यादिवशी केले वृक्षांचे वाटप

…मग मंदिरं का बंद ? (व्हिडिओ)

हॉटेल्स आणि बार सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद का ? पहा ‘लाईव्ह मराठी’ने जनसामान्यांकडून घेतलेला विशेष आढावा.  

error: Content is protected !!