इचलकरंजी येथे महिलांचा पाण्यासाठी रास्ता रोको…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरातील मंगळवार पेठ परिसरात नियमित पाणी पुरवठा होत नाही. याच्या निषेधार्थ परिसरातील महिलांनी नगरपालिकेच्या विरोधात आज (बुधवारी) सकाळी गांधी पुतळा येथे रास्ता रोको केला. आंदोलनास्थळी पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, नगरसेवक राहुल खंजिरे, नगरसेविका ध्रुवती दलवाई, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी भेट दिली.  महिलांनी आंदोलन मागे घ्यावे, पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन दिले.… Continue reading इचलकरंजी येथे महिलांचा पाण्यासाठी रास्ता रोको…

राजवर्धनसिंह कदम बांडे यांचे छ. शाहू महाराजांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराजांचे पंतू आणि धुळ्याचे माजी आमदार राजवर्धनसिंह कदम बांडे यांनी कोल्हापुरात नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळास आज (बुधवार) भेट देऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी शाहू महाराजांच्या समाधीला विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन छत्रपती ‘शाहू महाराज की जय’, जय शिवाजी, जय भवानी, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी अनिल… Continue reading राजवर्धनसिंह कदम बांडे यांचे छ. शाहू महाराजांना अभिवादन

‘चंदगड शासकीय जमीन’ हडप प्रकरण : मुख्य संशयित डॉक्टर अद्यापही मोकाट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील शेकडो एकर शासकीय जमीन हडपप्रकरणी एक मुख्य आरोपी वगळता इतर सर्व आरोपीवर अटकेची कारवाई झाली आहे. तो मुख्य आरोपी अद्याप मोकाट असून त्याच्यावर पोलिसांची मेहरनजर का? वास्तविक याबाबतचे वृत्त ‘लाईव्ह मराठी’ने प्रसिध्द करताच कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात खळबळ माजली. या प्रकरणातील संबंधित मुख्य आरोपी शहरातील प्रतिथयश मेंदूचा डॉक्टर आहे. म्हणून त्याला… Continue reading ‘चंदगड शासकीय जमीन’ हडप प्रकरण : मुख्य संशयित डॉक्टर अद्यापही मोकाट

आळते येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील कसबा आळते येथे जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले यांच्या जिल्हा परिषद फंडातून आणि १५ व्या वित्त आयोगातून १ कोटी ५३ लाखांची विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. या विकासकामांचे उद्‌घाटन किरण इंगवले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, ग्रा.पं. सदस्य शितल हावळे, अजिंक्य इंगवले, माजी… Continue reading आळते येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन

शरद पवारांच्या ‘त्या’ भाकीतावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांचा समावेश आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकीत केले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांपैकी फक्त आसाममध्ये सत्तेवर येऊ शकतो,… Continue reading शरद पवारांच्या ‘त्या’ भाकीतावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

…तर शिवसेनेचं सरकार पडू शकतं : कंगना राणावत

मुंबई (प्रतिनिधी) : माझा अनुभव मला सांगतोय, मनसुख हिरेन प्रकरणात मोठं षडयंत्र रचलं जात आहे, शिवसेना सत्तेत आल्यानंतरच या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जर या प्रकरणाचा योग्य तपास केला गेला, तर आरोपी नक्कीच सापडतील अन् तसं झालं तर शिवसेनेचं सरकार देखील पडू शकते, असा दावा अभिनेत्री कंगना राणावतने केला आहे.  मनसुख हिरेन मृत्यू… Continue reading …तर शिवसेनेचं सरकार पडू शकतं : कंगना राणावत

रविवार असल्याने नकारात्मक माहिती शेअर करणार नव्हतो पण…: चंद्रकांत पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : आज रविवार. आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती, अशा मजकुराचे ट्विट करत   भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारसह सर्वांचे लक्ष एका   महत्त्वाच्या विषयाकडे वेधले आहे. गेल्या वर्षभरात राज्यात झालेल्या महिला अत्याचारांच्या घटनांची यादी ‘महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी’ अशा मथळ्याखाली या ट्विटमध्ये पाटील यांनी दिली आहे. चंद्रकांत… Continue reading रविवार असल्याने नकारात्मक माहिती शेअर करणार नव्हतो पण…: चंद्रकांत पाटील

सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया

बारामती (प्रतिनिधी) : मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण स्थानिक आहे. मी त्यावर जास्त… Continue reading सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया

सचिन वाझेंनंतर आता ठाण्यातील नेत्याची चौकशी होणार ?

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ही कारवाई केली. दरम्यान, आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. या नेत्याचे आणि सचिन वाझे यांचे… Continue reading सचिन वाझेंनंतर आता ठाण्यातील नेत्याची चौकशी होणार ?

सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात १९ मार्चला राज्यभर रास्तारोको : राजू शेट्टी

महावितरणने सुरू केलेल्या सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात राज्यभरात १९ मार्चला रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

error: Content is protected !!