ए भाई, माझ्यावर बोट उचलायचं नाही : अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : ए भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं नाही. पोलिसांची खाती राज्यात यूटीआय बँक, अ‍ॅक्सिस बँकेला योग्यता पाहून दिली होती. लक्षात ठेव, सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही,  अशा  एकेरी शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी  मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना इशारा दिला  आहे. देवेंद्र फडणवीस यांनी… Continue reading ए भाई, माझ्यावर बोट उचलायचं नाही : अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

जयसिंगपुरात गावठी बॉम्बने हॉस्पिटल उडविण्याचा कट उधळला

शिरोळ (प्रतिनिधी) : जयसिंगपूर शहरातील डॉ. सतिश पाटील यांचे पायोस हॉस्पिटल गावठी बाँम्बने उडवून देण्याचा कट जयसिंगपूर पोलिसांनी उधळून लावला. ही घटना आज (रविवारी) दुपारी अडीच्या सुमारास घडली. जयसिंगपूर पोलिस व कोल्हापूर बॉम्ब शोध व नाशक पथकाच्या अथक प्रयत्नानंतर गावठी बॉम्ब निकामी केल्यानंतर पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.   याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती… Continue reading जयसिंगपुरात गावठी बॉम्बने हॉस्पिटल उडविण्याचा कट उधळला

फडणवीस दिल्लीत गेल्यावर पत्र समोर आलं : शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर पत्र समोर आले. त्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नाही. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नाही,… Continue reading फडणवीस दिल्लीत गेल्यावर पत्र समोर आलं : शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

अमृतमामा भोसले युवा शक्तीच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील पैलवान अमृतमामा भोसले युवा शक्तीच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुना चंदूर रोड परिसरातील हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिरमध्ये आयोजित केलेल्या शिबिराचे उद्‌घाटन माजी आमदार सुरेश हाळवणकर , उद्योगपती सतीश डाळ्या यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अथायु रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने नेत्र विकार, हृदयविकार, हाडाचे विकार,… Continue reading अमृतमामा भोसले युवा शक्तीच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिंपी गटाला ‘गोकुळ’ची उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशील : आ. जयंत आसगावकर

आजरा (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) आगामी निवडणुकीसाठी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला जिल्ह्यातून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीत’ गोकुळ’ मध्ये परिवर्तन अटळ आहे. तालुक्यात शिंपी गटाची ताकद पाहता त्यांच्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी आज (रविवार)… Continue reading शिंपी गटाला ‘गोकुळ’ची उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशील : आ. जयंत आसगावकर

…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची चौकशी करण्यात यावी. तसे न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुण्यातील अलका चौकात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निषेधार्थ भाजपने आज (रविवार)  आंदोलन केले. त्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. … Continue reading …तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. याच्या निषेधार्थ आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज (रविवार) बिंदू चौकात  आंदोलन केले. यावेळी महाविकास… Continue reading गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

…त्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्याची भाजपची तयारी : काँग्रेसचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : देशात विरोधी पक्षांची सरकारं टिकू दिली जात नाहीत, आणि त्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्याची मोदी सरकारची व भाजपची तयारी असते, हे वेळोवेळी आपण पाहिलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचं काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी ज्या पद्धतीचे प्रयत्न झाले. राजस्थानमध्ये काँग्रेसचं गेहलोत सरकार पाडण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न झाले, हे आपण पाहिलेलं आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन… Continue reading …त्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्याची भाजपची तयारी : काँग्रेसचा आरोप

घराचा वीजपुरवठा तोडल्याने रिक्षाचालकाचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरगुती वीज कनेक्शन तोडल्याने संभाजीनगर येथील एका रिक्षाचालकाने चक्क महावितरण कार्यालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारीन, अशी धमकी दिल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. आज (शनिवार) दुपारी सावित्रीबाई फुले रुग्णालय परिसरातील महावितरण कार्यालयाजवळ हा प्रकार घडला. सुमारे दीड तास या रिक्षा व्यावसायिकाने महावितरणच्या चौथ्या मजल्यावर बसून आपला संताप व्यक्त केला. शोले स्टाईलने दिलेल्या इशाऱ्यामुळे… Continue reading घराचा वीजपुरवठा तोडल्याने रिक्षाचालकाचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन…

मादळेच्या शेतकऱ्याने कलिंगड लागवडीतून २० गुंठ्यात घेतले लाखाचे उत्पादन

टोप (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील मादळे येथील शेतकरी जालिंदर पवार यांनी २० गुंठे मुरमाड शेतीतून कलिंगडचे दहा टन उत्पादन घेतले आहे. यामध्ये त्यांना एक लाख रुपये दोन महिन्यात मिळाले आहेत. मिरची सारख्या आंतरपिकातून दुहेरी उत्पन्न  घेत त्यांना एक लाखाचे उत्पादन मिळाले. जालिंदर पोवार यांनी खाजगी कंपनीत नोकरी सोडून स्वतःची शेती करण्याचा निर्णय घेतला. मादळे येथे… Continue reading मादळेच्या शेतकऱ्याने कलिंगड लागवडीतून २० गुंठ्यात घेतले लाखाचे उत्पादन

error: Content is protected !!