गडहिंग्लजमध्ये शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बेळगाव महापालिकेचे उपमहापौर प्रकाश शिरोळकर  यांच्या वाहनाच्या मराठी नंबरप्लेटवर काही कानडी लोकांनी काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. तसेच भगव्या ध्वजाची मोडतोड करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ गडहिंग्लज शिवसेनेच्या वतीने दसरा चौकात कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आज (शनिवार) निषेध व्यक्त करण्यात आला.   यावेळी शहर प्रमुख अशोक शिंदे, संजय संकपाळ, सुरेश… Continue reading गडहिंग्लजमध्ये शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध

रेखा जरे खूनप्रकरण : अखेर पत्रकार बाळ बोठे याला अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अटक करण्यात आली आहे. आज (शनिवार) पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादमधून ताब्यात घेतले .  मागील तीन महिन्यांपासून बोठे  याच्या मागावर पोलीस होते. पण तो गुंगारा देत होता. अखेर  त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पाच… Continue reading रेखा जरे खूनप्रकरण : अखेर पत्रकार बाळ बोठे याला अटक

महिला सबलीकरणासाठी शिवसेना-भगिनी मंच सदैव तत्पर : वैशाली क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महिलांच्या सबलीकरणासाठी शिवसेना आणि भगिनी मंच नेहमीच एक पाऊल पुढे असतो. त्यामुळे येणाऱ्या काळातही लेक वाचवा, लेक शिकवा अभियानातून महिलांच्या सबलीकरणाचे कार्य अविरत सुरु ठेवणार आहे. महिला सबलीकरणासाठी शिवसेना आणि भगिनी मंच सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी केले. त्या महिला दिनानिमित्त आज (सोमवार) बोलत होत्या.… Continue reading महिला सबलीकरणासाठी शिवसेना-भगिनी मंच सदैव तत्पर : वैशाली क्षीरसागर

कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात ४७ जणांचा डिस्चार्ज, एकाचा मृत्यू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत ३४ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) दिवसभरात ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ७०७ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.   कोल्हापूर शहरातील २०, गडहिंग्लज तालुक्यातील ४, हातकणंगले तालुक्यातील आणि करवीर तालुक्यातील प्रत्येकी ३, कागल तालुक्यातील १ तर इतर जिल्ह्यातील ३… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात ४७ जणांचा डिस्चार्ज, एकाचा मृत्यू…

कोल्हापुरात एक टन कचरा, प्लास्टिक गोळा

कोल्हापूर (प्रतिनिधी): शहरातील विविध ठिकाणी राबवलेल्या महास्वच्छता अभियानात एक टन कचरा, प्लास्टिक गोळा करण्यात आला. मोहिमेचा ९६ वा रविवार होता. शेंडापार्क ते एसएससी बोर्ड, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी मेनरोड, खानविलकर पंप ते रमनमळा चौक, दसरा चौक ते खानविलकर पंप, टेंबलाईवाडी ब्रिज, लिशा हॉटेल चौक ते कावळा नाका परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्वरा फौंडेशनच्यावतीने रंकाळा परिसरात… Continue reading कोल्हापुरात एक टन कचरा, प्लास्टिक गोळा

यड्राव येथील जुगार अड्यावर छापा

इचलकरंजी (प्रतिनिधी): यड्राव येथील पार्वती इंडस्ट्रीजमध्ये असणाऱ्या हॉटेल अॅकॅाडेवर तीनपानी जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांचा छापा टाकला. या कारवाईत तीन चाकी वाहने, ६ मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम ३,२४८०० रूपये असे एकूण २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष गोपाल शेट्टी (वय ५३ रा. इचलकरंजी), विनोद चव्हाण (वय ४९ रा. सांगली), नासीर नदाफ (वय ४८… Continue reading यड्राव येथील जुगार अड्यावर छापा

केडीसीसीला ५७ लाखांचे अर्थसहाय्य

कोल्हापूर (प्रतिनिधी): नाबार्डकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जिल्हयातील दुर्गम भागांतील खातेदारांना बॅंकिंग व एटीएम सुविधा देण्यासाठी तीन मोबाईल व्हॅनकरिता ४५ लाख तसेच बॅंकेच्या ग्राहकांना पुरविलेल्या रुपे डेबिट कार्ड सुविधेपोटी १२ लाख असे एकूण ५७ लाखाचे नाबार्डकडून अर्थसहाय्य जमा झाले, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी दिली. ते म्हणाले, नाबार्डकडून कोल्हापूर… Continue reading केडीसीसीला ५७ लाखांचे अर्थसहाय्य

कोरोना लस या दिवसापासून मोफत

नवी दिल्ली (प्रतिनिधी): कोरोना प्रतिबंध लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. आता १ मार्चपासून  या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेले ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास प्राधान्य देण्यात येईल. कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण अभियानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात… Continue reading कोरोना लस या दिवसापासून मोफत

घाटगेंच्या त्या उपोषणावरुन फडणवीसांचा सरकारला इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी): शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांच्या उपोषणाची दखल घ्या. अन्यथा या मोहिमेला मोठ्या आंदोलनाचे स्वरूप यायला वेळ लागणार नाही, असा गंभीर इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते. घाटगे यांचे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लॉकडाऊन काळातील वीजबिल माफी यासाठी उपोषण सुरु आहे. या उपोषणाला… Continue reading घाटगेंच्या त्या उपोषणावरुन फडणवीसांचा सरकारला इशारा

भाजप नेत्यासह दोन मुलांना अटक

कोलकाता (प्रतिनिधी): पामेला गोस्वानी ड्रग्ज प्रकरणी कोलकाता पोलिसांनी भाजप नेते राकेश सिंह यांना अटक केली. राकेश सिंह यांच्या मुलांनाही घरातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात करण्यात आली आहे. राकेश सिंह यांची मुले बंगालमधून फरार होण्याच्या तयारीत होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली आहे. पामेला गोस्वामी भाजपा युवा मोर्चाची कार्यकर्ता… Continue reading भाजप नेत्यासह दोन मुलांना अटक

error: Content is protected !!