रमाई आवास योजनेच्या घरकुलधारकांना आ. मुश्रीफ यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटप…

कागल (प्रतिनिधी) : कागल येथील रमाई आवास योजनेच्या ५५ घरकुलधारकांना आमदार हसन मुश्रीफ  यांच्या हस्ते मंजूरीपत्रांचे वाटप झाले. त्याबद्दल आ. मुश्रीफ यांचा घरकुलधारकांच्यावतीने कृतज्ञतापर सत्कार झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, महात्मा फुले वसाहत, दावने वसाहत, श्री. गहिनीनाथ नगर, संत रोहिदास चौक, माळभाग वड्डवाडी, श्री. शाहूनगर बेघर वसाहत, मातंग वसाहत, राजीव गांधी वसाहत येथील रहिवाशांचा… Continue reading रमाई आवास योजनेच्या घरकुलधारकांना आ. मुश्रीफ यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटप…

आ. विनय कोरे यांच्या प्रयत्नातून तरूणावर मोफत शस्त्रक्रिया

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील सागर लक्ष्मण पाटील (वय ३२) या तरूणावरती मुंबई येथे मोफत (टोटल हिप रिप्लेसमेंट) ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी सुमारे ९ लाख ५० हजार रुपये खर्च झाला. आ. डॉ.विनय कोरे यांच्या प्रयत्नातून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सागरची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची वडील वारल्यानंतर आई व अपंग बहीणीची संपूर्ण जबाबदारी सागर वरतीच होती.… Continue reading आ. विनय कोरे यांच्या प्रयत्नातून तरूणावर मोफत शस्त्रक्रिया

निगवे खालसातील नृसिंह सरस्वती मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील नृसिंह सरस्वती मंदिरास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. माजी गृहराज्यमंत्री व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. निगवे खालसा येथे १९८० च्या दरम्यान स्थापन झालेल्या नृसिंह सरस्वती मंदिरात जयंती उत्साहात साजरी होते.… Continue reading निगवे खालसातील नृसिंह सरस्वती मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा

गायरान अतिक्रमणधारकांचा मंगळवारी सर्वपक्षीय महामोर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील गायरान जमिनीतील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाविरोधात मंगळवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय महामोर्चा काढणार असल्याची माहिती माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमणे काढून टाकण्याचा कालबद्ध आराखडा निश्चित करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई होणार… Continue reading गायरान अतिक्रमणधारकांचा मंगळवारी सर्वपक्षीय महामोर्चा

संचालकच भर सभेत सभासदांना मारहाण करतात : उमेश निगडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : थकबाकीत वाढ, मर्यादित लोकांना एकरकमी कर्जफेड योजना सवलत, बँकेच्या ठेवी कमी का झाल्या; ऑडिट वर्ग का घसरला; दोन वर्षे लाभांश मिळाला नाही, असे प्रश्न हक्काने विचारणाऱ्या सूज्ञ सभासदांना स्वतः संचालक मारहाण करतात. ही या बँकेची संस्कृती नाही; पण आता कारभार चुकीच्या हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे. हे सभासदांना माहिती झाले म्हणूनच सभासदांना मारहाण… Continue reading संचालकच भर सभेत सभासदांना मारहाण करतात : उमेश निगडे

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आदगोडा पाटील यांचे निधन

शिरोळ (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आदगोडा देवगोंडा पाटील यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने जयसिंगपूर येथे निधन झाले. ते १०८ वर्षांचे होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक थोर नेत्यांनी आपले प्राणपणाला लावले. त्यापैकीच एक म्हणून स्वातंत्र्यसेनानी आदगोंडा पाटील यांची ओळख होती. स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक क्रांतिकारकांबरोबर प्रत्येक लढ्यात सहभाग घेऊन त्यांनी आपले शौर्य दाखवले… Continue reading ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आदगोडा पाटील यांचे निधन

पोलिसांवर ‘वरून’ दबाव येतोय : सुप्रिया सुळे

मुंबई (प्रतिनिधी) : जितेंद्र आव्हाड लढवय्ये नेते आहेत. त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवले आहे. त्यानंतर समजले की त्यांच्या अटकेसाठी ‘वरुन’ दबाव आहे. वरुन दबाव आहे म्हणजे कुठून हे मला माहिती नाही. मी कुणावरही आरोप करत नाही. पोलिसांवर दबाव येतोय. यात त्या बिचाऱ्यांची काहीच चूक नाही. मी सत्तेत असो वा नसो मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान… Continue reading पोलिसांवर ‘वरून’ दबाव येतोय : सुप्रिया सुळे

सानिया मिर्झा-शोएब मलिक होणार विभक्त

दुबई (वृत्तसंस्था) : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असून, दोघे घटस्फोट घेणार असल्याचे आता निश्चित  झाले आहे. त्यांचा १२  वर्षांचा सुखी संसार मोडला आहे; मात्र सानिया मिर्झ आणि शोएब मलिककडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सानिया… Continue reading सानिया मिर्झा-शोएब मलिक होणार विभक्त

चंद्रकांतदादांनी घेतले दोन अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व!

पुणे (प्रतिनिधी) : राजकारणाचा स्तर आणि राजकीय वारे बेबंद दिशेने वाहत असलेल्या आजच्या जमान्यात आपली सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशीलता जतन करणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांचे नाव घ्यावे लागेल. याचा प्रत्यय पुण्यात घडलेल्या एका घटनेने आला. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या लेकरांच्या पालनपोषणासाठी कष्ट उपसणाऱ्या आजीवरही अर्धांगवायूच्या झटक्याने घाला घातला. आता ती लेकरे पुन्हा उघड्यावर पडणार असे… Continue reading चंद्रकांतदादांनी घेतले दोन अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व!

पुण्यात मांजर पाळण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक

पुणे (प्रतिनिधी) : ‘पुणे तिथे काय उणे’ हे आपण कायम ऐकतो. पुणेकर कधी काय करतील याचाही काही नेम नाही. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पुण्याची नेहमीच चर्चा होत असते. पुणेकरांचे तिरकसं बोलणे आणि पुणेकरांचा मदत करण्याचा स्वभाव या कोणत्या ना कोणत्या कारणाने पुणे नेहमीच चर्चेत असते. आज पुन्हा चर्चेत आले ते घरात मांजर पाळण्यासाठी पुणे महापालिकेचा… Continue reading पुण्यात मांजर पाळण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक

error: Content is protected !!