मी आकडे सांगायला आलेलो नाही : मुख्यमंत्री

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : येत्या दोन दिवसात मदतीचा निर्णय जाहीर करु. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने पुन्हा उभे करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. मी आकडे सांगायला आलेलो नाही, जे करणार ते तुमच्या समाधानासाठी करु, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मी तुम्हाला नवीन नाही किंवा… Continue reading मी आकडे सांगायला आलेलो नाही : मुख्यमंत्री

बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा : बच्चू कडू

अमरावती (प्रतिनिधी) : देशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. यामुळे कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका. जर परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा’, असे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने इराणमधून नुकताच कांदा आयात केल्याने संपूर्ण देशासह राज्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात… Continue reading बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा : बच्चू कडू

पंतप्रधान मोदी ‘दारूडे’: प्रकाश आंबेडकर घसरले

मुंबई (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मोदींचा ‘दारुडे’ असा उल्लेख केला. यामुळे ते वादाच्या भोवऱ्यातच अडकण्याची शक्यता आहे.  पंतप्रधानाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.    पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले की, मोदी या देशाचे पंतप्रधान नसून… Continue reading पंतप्रधान मोदी ‘दारूडे’: प्रकाश आंबेडकर घसरले

बोलघेवडेपणा सोडा, कृती करा : देवेंद्र फडणवीसांचा सरकाराला टोला

हिंगोली (प्रतिनिधी) : आम्हाला जयंत पाटलांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. जयंत पाटलांनी आम्हाला खोटं ठरवण्याऐवजी मदत करावी. लोक अडचणीत आले आहेत, पण अजूनही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे बोलघेवडेपणा सोडा आणि कृती करा, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज (बुधवार)… Continue reading बोलघेवडेपणा सोडा, कृती करा : देवेंद्र फडणवीसांचा सरकाराला टोला

आयजीएम रूग्णालयाबाबत प्रकाश आवाडेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘ही’ मागणी

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालय (आयजीएम) पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरु करावे, कोरोनामुळे मयत नगरपालिका कर्मचाऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळावा, अशा मागणीचे निवेदन आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.  यावेळी आयजीएममध्ये फक्त स्पेशल रूममध्ये कोरोनाबधित रुग्णावर उपचार होतात. इतर सर्व विभागात पूर्वीप्रमाणे सर्वच आजारांवरील उपचार, आरोग्यसेवा सुरू… Continue reading आयजीएम रूग्णालयाबाबत प्रकाश आवाडेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘ही’ मागणी

अरुण सुतार यांची जि. प. च्या ‘जलसंधारण समिती’वर निवड  

चंदगड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीवर जि.प. सदस्य अरुण सुतार यांची निवड करण्यात आली. जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील यांनी त्यांना निवडीचे पत्र  सुपूर्द करून त्यांचा सत्कार केला. यावेळी महाविकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार राजेश पाटील यांच्या सूचनेनुसार घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला जि. प. मध्ये  झालेल्या… Continue reading अरुण सुतार यांची जि. प. च्या ‘जलसंधारण समिती’वर निवड  

राहुल गांधींनी माजी मुख्यमंत्र्यांना फटकारले, ‘असली भाषा चालणार नाही !’

वायनाड (वृत्तसंस्था) : कमलनाथ यांनी वापरलेली भाषा मला अजिबात आवडलेली नाही. असली भाषा चालणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना चांगलंच फटकारलं. कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल ‘आयटम’ शब्द वापरल्यामुळे देशभर वाद निर्माण झाला होता. त्यावरून राहुल गांधी यांनी त्यांना ही समज दिली.… Continue reading राहुल गांधींनी माजी मुख्यमंत्र्यांना फटकारले, ‘असली भाषा चालणार नाही !’

शरद पवारांना मुख्यमंत्र्यांना वारंवार प्रोजेक्ट करावं लागतयं : चंद्रकांत पाटील  

पुणे (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री  प्रवास करत आहेत, हे स्वागतार्ह आहे. पण वाईट याचे वाटते की, शरद पवार यांना वारंवार मुख्यमंत्र्यांना प्रोजेक्ट करावे लागत आहे, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.  पत्रकारांशी ते बोलत होते. पाटील म्हणाले की, सरकार एकत्र चालवायचे म्हणून शरद… Continue reading शरद पवारांना मुख्यमंत्र्यांना वारंवार प्रोजेक्ट करावं लागतयं : चंद्रकांत पाटील  

‘त्या’ कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : आरपीआयची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीपीआर येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये झालेल्या स्फोटानंतर तिघा अत्यवस्थ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या सर्व दुर्घटनेची चौंकशी करून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना त्वरित मदत देण्यात यावी. अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आज (सोमवार) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सीपीआरमध्ये काही दिवसापूर्वी… Continue reading ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : आरपीआयची मागणी

विरोधकांचे आमच्यावर वैफल्यातून आरोप : सतीश पाटील (व्हिडिओ)

आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेतील कामकाजावरून विरोधक आमच्यावर वैफल्यातून आरोप करीत असल्याचे प्रत्युत्तर उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिले आहे.  

error: Content is protected !!