पुणे (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री  प्रवास करत आहेत, हे स्वागतार्ह आहे. पण वाईट याचे वाटते की, शरद पवार यांना वारंवार मुख्यमंत्र्यांना प्रोजेक्ट करावे लागत आहे, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.  पत्रकारांशी ते बोलत होते.

पाटील म्हणाले की, सरकार एकत्र चालवायचे म्हणून शरद पवार मुख्यमंत्र्यांची भलामण करत आहेत. बाबा मी या वयात इतका फिरतोय तू ही किमान बाहेर पड, असे पवारांना वाटत असावे. मुख्यमंत्र्यांनी धावत प्रवास करून उपयोग नाही. कोरडा प्रवास नको. मुख्यमंत्र्यांनी मदतीसंबंधी निर्णय घ्यावा. प्रत्येक वेळी केंद्र, केंद्र करायचं नसते. आपत्तीवेळी पहिली मदत राज्य सरकारने करायची असते. केंद्राकडून जे मिळेल ते बोनस समजावे, असेही पाटील म्हणाले.