चंदगड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीवर जि.प. सदस्य अरुण सुतार यांची निवड करण्यात आली. जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील यांनी त्यांना निवडीचे पत्र  सुपूर्द करून त्यांचा सत्कार केला. यावेळी महाविकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार राजेश पाटील यांच्या सूचनेनुसार घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला जि. प. मध्ये  झालेल्या महाविकास आघाडीच्या पार्टी मीटिंगमध्ये अरुण सुतार यांना जलसंधारण समितीमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

गेल्या साडेतीन वर्षापासून नेत्यांच्या तसेच पक्षाच्या अधीन राहून प्रामाणिकपणे काम केल्याचे फळ मिळाल्याचा आनंद होत आहे.  या पदाच्या माध्यमातून जिल्ह्याबरोबर आपल्या भागाचाही विकास जोमाने करणार असल्याचे   सुतार यांनी निवडीनंतर सांगितले.