भारताचे नेदरलँडसमोर १८० धावांचे लक्ष्य

सिडनी : टी-२० विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँडसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माच्या सुरेख खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या. विराटने ४४  चेंडूत ६२, सूर्याने २५ चेंडूत ५१ आणि रोहितने ३९ चेंडूत ५३ धावा केल्या. नेदरलँड्सकडून फ्रेड क्लासेन आणि पॉल वॉन मेकर्न यांनी… Continue reading भारताचे नेदरलँडसमोर १८० धावांचे लक्ष्य

पुरुष-महिला क्रिकेटपटूंना समान मानधन मिळणार

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला-पुरुष खेळाडूंच्या मानधनाबाबतीत एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने करारबद्ध केलेल्या भारतीय महिला क्रिकेटूंना पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे समान मानधन देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विविध क्रिकेट सामन्यासाठी पुरुष क्रिकेटर्सप्रमाणे आता महिला क्रिकेटपटूंनाही समान वेतन असेल. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. कसोटी क्रिकेटमधील एका… Continue reading पुरुष-महिला क्रिकेटपटूंना समान मानधन मिळणार

भारताबरोबरच्या पुढील सामन्यात पाकिस्तानच जिंकेल : शोएब अख्तर

मेलबर्न : भारताकडून झालेला हा पराभव पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला पचवता आलेला नाही. त्याने थेट भारताला आव्हान दिले आहे. भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा सामना होईल. त्या सामन्यामध्ये पाकिस्तान भारतावर हमखास विजय मिळवेल, असे शोएब अख्तर म्हणाला. पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरने यू-ट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओत शोएब अख्तरने भारताने आपला विजय वाया घालवू… Continue reading भारताबरोबरच्या पुढील सामन्यात पाकिस्तानच जिंकेल : शोएब अख्तर

भारत-पाकिस्तान यांच्यात रविवारी हायहोल्टेज सामना

मेलबर्न : भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबर रोजी आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील ही लढत मेलबर्न क्रिकेट मैदानावर होईल. गेल्या वर्षी युएईमध्ये टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली होती आणि तेव्हा भारताचा १० गडी राखून पराभव झाला होता. आता त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी रोहित आणि कंपनी मैदानात उतरले. दिवाळीच्या आदल्या दिवशी या दोन पारंपरिक… Continue reading भारत-पाकिस्तान यांच्यात रविवारी हायहोल्टेज सामना

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी विराज कदमची निवड

पन्हाळा (प्रतिनिधी) : संजीवन नॉलेज सिटी येथील छत्रपती कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता १२ वीचा विद्यार्थी विराज शहाजी कदम यांची राज १८ वर्षांखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संजीवन पब्लिक स्कूलच्या मैदानावर कोल्हापूर जिल्हा संघात प्रथम या खेळाडूची निवड करण्यात आली. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागीय स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाकडून उत्कृष्ट खेळाच्या… Continue reading राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी विराज कदमची निवड

भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट

मेलबर्न (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही देशांमधील सामना होणार आहे. अशा स्थितीत हवामान खात्याच्या अहवालानुसार २१ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियन महानगरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मेलबर्नमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची ६५ टक्के शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांच्या पदरी निराशा… Continue reading भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची निवड

मुंबई (प्रतिनिधी) : माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ३६ वे अध्यक्ष झाले आहेत. बोर्डाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये बिन्नी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते आता सौरव गांगुलीची जागा घेणार आहेत. यासोबतच भाजपचे नेते आशीष शेलार यांची आता ‘बीसीसीआय’चे कोषाध्यक्ष म्हणून बिनविरोध नियुक्ती झाली आहे. ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय… Continue reading बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची निवड

शेवटच्या षटकात शमीचे ४ बळी, भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

ब्रिस्बेन: भारतीय क्रिकेट संघाचे ‘मिशन टी-२० विश्वचषक’ आज खर्‍या अर्थाने सुरू झाले असून, टीम इंडियाचा पहिला सराव सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज झाला. मोहम्मद शमीच्या शेवटच्या षटकातील जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला. मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाचे एकापाठोपाठ एक असे चार गडी बाद केले. त्यात एक धावबाद होता. विराट कोहलीने टीम… Continue reading शेवटच्या षटकात शमीचे ४ बळी, भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

महिला आशियायी क्रिकेट स्पर्धेत भारताची बाजी…  

मुंबई (प्रतिनिधी) :  वुमेन्स आशिया कपमध्ये टीम इंडियाने बाजी मारली आहे. या विजयासह टीम इंडियाने सातव्यांदा आशिया कपवर नाव कोरलं आहे. भारताने ८ विकेट आणि ६९ बॉल राखून हा मोठा विजय मिळवला आहे. आशिया कपच्या  फायनल सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियासमोर ६५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने सहज पुर्ण केले. यामध्ये स्मृती मंधनाने सर्वाधिक… Continue reading महिला आशियायी क्रिकेट स्पर्धेत भारताची बाजी…  

मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती यांचा सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबईत झालेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईतील कुपरेज फुटबॉल ग्राऊंड येथे प्रफुलभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली वेस्टर्न इंडिया फुटबॉल असो.ची वार्षिक सभा झाली. या सभेसाठी व्हा. प्रेसिडेंट्स् हरिष वोरा, विश्वजित कदम, मालोजीराजे छत्रपती, आदित्य ठाकरे व जनरल सेक्रेटरी साऊटर वाझ,… Continue reading मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती यांचा सत्कार

error: Content is protected !!