कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबईत झालेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती यांचा सत्कार करण्यात आला.

मुंबईतील कुपरेज फुटबॉल ग्राऊंड येथे प्रफुलभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली वेस्टर्न इंडिया फुटबॉल असो.ची वार्षिक सभा झाली. या सभेसाठी व्हा. प्रेसिडेंट्स् हरिष वोरा, विश्वजित कदम, मालोजीराजे छत्रपती, आदित्य ठाकरे व जनरल सेक्रेटरी साऊटर वाझ, ट्रेझरर प्यारेलाल चौधरी, असि.सेक्रेटरीज व कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा असोसिएशनचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन. जॉईंट जनरल सेक्रेटरी राजेंद्र दळवी हेही उपस्थित होते.

या सभेमध्ये केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या विशेष महत्त्व असलेल्या फायनान्स समितीवर उपाध्यक्षपदी, स्पर्धा समितीवर सदस्यपदी याचबरोबर १७ वर्षांखालील मुली जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या अंतर्गत महाराष्ट्रात होणाऱ्या सामन्यांसाठी एआयएफएफचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच केएसएच्या पेट्रन- मधुरिमाराजे छत्रपती यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्या म्हणून सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुलभाई पटेल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.