कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आज पोलीस परेड ग्राउंड येथे घेण्यात आल्या. याचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय क्रीडापटू कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प.चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे तसेच झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष नरेंद्र झवर, रोटरी होरायझनचे सर्व पदाधिकारी या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी खेळाडूंनी जिंकणं आणि हारणं मनावर न घेता केवळ आपल्या उद्दिष्टाकडे लक्ष द्यावे. आणि उद्दिष्ट पूर्तीकडे उत्साहाने वाटचाल करावे, असे मार्गदर्शन कृष्णराज महाडिक यांनी विद्यार्थ्याना केले.

या क्रीडा स्पर्धेतून गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार आहे.  अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.