दीपिका पदुकोण करणार फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण

कातर : येथे सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकप २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर २०२२ रोजी होणार असून, अभिनेत्री दीपिका पदुकोण यावेळी फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण करणार आहे. दीपिका ग्लोबल आयकॉन आहे आणि बॉलिवूडप्रमाणे हॉलीवूडमध्येही तिने काम केले आहे. फिफा ट्रॉफी अनावरणाची जबाबदारी दीपिकावर सोपवली जाणे हा भारतीय कलाकाराला मिळालेला सन्मान असून, फिफाच्या इतिहासात प्रथमच अशी… Continue reading दीपिका पदुकोण करणार फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण

‘क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडे कोल्हापूर’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या जगभरात फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे वारे असून, विश्वविजेतेपदासाठी अनेक संघ कतार येथे घाम गाळत आहेत. संघासोबतच त्यांच्या समर्थकांचा आणि चाहत्यांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे. कोल्हापुरातील प्रत्येक संघाचा चाहता वर्ग असून, गल्लोगल्ली लागलेले विविध फुटबॉल खेळाडूचे भव्य फलक, ठिकठिकाणी मॅचच्या वेळी लावण्यात येणारे स्क्रीन कोल्हापूरच्या फुटबॉल वेडाची साक्ष देत आहेत. कोल्हापूरचे फुटबॉल… Continue reading ‘क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडे कोल्हापूर’

‘रणजी’साठी अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे नेतृत्व

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यादरम्यान कर्णधारपदी मुंबईकर अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेत अजिंक्य रहाणे मुंबईचे नेतृत्व करणार आहे. रणजी ट्रॉफीसाठी एमसीएने मुंबई संघाची घोषणा केली आहे. रणजी स्पर्धेच्या १३ व्या मोसमाची सुरुवात ही… Continue reading ‘रणजी’साठी अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे नेतृत्व

कोरियाविरुद्ध लढतीसाठी नेमार पुन्हा मैदानात

कातर : फिफा विश्वचषक स्पर्धा सुरु असताना ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार पायाच्या दुखापतीमुळे काही सामने तो विश्रांतीवर होता; पण आता तो दुखापतीतून सावरल्यानंतर ब्राझीलकडून दक्षिण कोरियाविरुद्धच्या विश्वचषकाची बाद फेरीच्या सामन्यात उतरण्याची शक्यता आहे. त्याने पुन्हा सराव सुरू केला आहे. सर्बियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो सरावासाठी आला नव्हता. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात त्याच्या घोट्याला दुखापत झाली… Continue reading कोरियाविरुद्ध लढतीसाठी नेमार पुन्हा मैदानात

चाणक्य मार्शल आर्ट्सच्या खेळाडूंकडून ५१ पदकांची कमाई

कोल्हापूर (प्रतिनिधी) : म्हापसा गोवा येथील पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या दहाव्या राष्ट्रीय निमंत्रित कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये चाणक्य मार्शल आर्ट्स संस्थेच्या २७ मुला-मुलींनी २९ सुवर्ण, ७ रौप्य व १५ कांस्यपदकांची घवघवीत कमाई करत ५१ पदके मिळवली आणि तिसऱ्या क्रमांकाच्या सांघिक चॅम्पियनशिप ट्रॉफीवर नाव कोरले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गोवा अशा विविध राज्यांतून सुमारे… Continue reading चाणक्य मार्शल आर्ट्सच्या खेळाडूंकडून ५१ पदकांची कमाई

गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत श्रावणी इंजरला सुवर्णपदक…         

गगनबावडा (प्रतिनिधी) : दत्ताजीराव मोहिते-पाटील माध्यमिक विद्यालय  तिसंगी हायस्कूलची विद्यार्थिनी श्रावणी इंजर (रा. खोकुर्ले ता. गगनबावडा) ने गोवा येथील राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले. शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या. यासाठी तिला संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते-पाटील, मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील, पर्यवेक्षक. एस.एच.पाटील, संचालक एम. डी. मोहिते-पाटील, क्रीडा शिक्षक एच.एस.सुतार आदींचे… Continue reading गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत श्रावणी इंजरला सुवर्णपदक…         

मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलची सुवर्णपदकाला गवसणी

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचा सुपुत्र नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने ईजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या प्रेसिडेंट कपच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत महाराष्ट्रासह भारताचे नाव मोठे केले आहे. या कामगिरीमुळे जागतिक शूटर ऑफ द इअरसह सुवर्णपदकाचा पहिला भारतीय मानकरी रुद्रांक्ष ठरला आहे. त्याला तब्बल १५००० डॉलरचे (जवळपास १२ लाख रुपये) बक्षीस मिळाले आहे. रुद्रांक्ष… Continue reading मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलची सुवर्णपदकाला गवसणी

बांगलादेश दौऱ्यातून शमी बाहेर

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि बांगलादेश यांच्यात उद्यापासून एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. या मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. बीसीसीआयने त्याच्या जागी संघात वेगवान गोलंदाज उम्रान मलिक याचा समावेश केल्याची माहिती बीसीसीआयने शनिवारी सकाळी दिली. बीसीसीआयने पत्रकाद्वारे सांगितले की, बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय… Continue reading बांगलादेश दौऱ्यातून शमी बाहेर

वारणानगर येथे १३ डिसेंबर रोजी कुस्तीचा महासंग्राम

वारणानगर (प्रतिनिधी) : सहकारमहर्षी स्व. विश्वनाथ आण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांच्या २८ व्या पुण्यस्मरणार्थ भारतातील सर्वश्रेष्ठ मल्लयुद्ध-२०२२ अर्थात कुस्ती महासंग्राम मंगळवार, दि. १३ डिसेंबर रोजी वारणा विद्यालयाच्या क्रीडांगणावर होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मैदानापैकी एक समजले जाणारे ‘वारणा’ कुस्ती मैदान आहे. कोरोना महामारीमुळे दोन वर्ष मैदान झाले नव्हते; मात्र चालू वर्षी ‘वारणा’ कुस्ती स्पर्धा… Continue reading वारणानगर येथे १३ डिसेंबर रोजी कुस्तीचा महासंग्राम

आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ रवाना

कोल्हापूर (प्रतिनिधी): औरंगाबाद येथे दि. ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या २४ व्या आंतरविद्यापीठ क्रीडामहोत्सव-२०२२ साठी शिवाजी विद्यापीठाचा १४० जणांचा संघ आज (गुरुवारी) रवाना झाला. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या संघाला शुभेच्छा देण्यात आल्या. औरंगाबाद येथील आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात दहा संघ व्यवस्थापक आणि दहा प्रशिक्षक यांच्याबरोबरच… Continue reading आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ रवाना

error: Content is protected !!