विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

कळे (प्रतिनिधी) : मोरेवाडी, ता. पन्हाळा येथे आठ दिवसापूर्वी विषारी औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. जयश्री परशराम मोरे (वय ३०) असे तिचे नाव असून, तिचा मानसिक व शारिरीक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती परशराम निवृत्ती मोरे (वय ३६), सासू सावित्री निवृत्ती मोरे (वय ६०), सासरे निवृत्ती बापू मोरे (वय ६५) … Continue reading विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

म्हैसाळमधील ९ जणांची आत्महत्या नसून हत्याकांडच

सांगली (प्रतिनिधी) : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील ९ जणांनी सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. ‘त्या’ ९ जणांची आत्महत्या नसून त्यांचे हत्याकांड झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दोघांनी या लोकांच्या जेवणात विष घालून त्यांना मारल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित… Continue reading म्हैसाळमधील ९ जणांची आत्महत्या नसून हत्याकांडच

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावर गुन्हा दाखल…

कोल्हापूर (प्रतिनधी) : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर शिवसैनिक संतप्त झाले आहेत. राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवलेसह दहा जणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रणजीत जाधव यांनी दिली आहे. याप्रकरणी राजेंद्र जाधव, गुप्तजित मोहिते, शैलेश हिरासकर, राकेश माने… Continue reading शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावर गुन्हा दाखल…

साळोखे नगर परिसरात तरुणाचा भोसकून खून

कोल्हापूर : साळोखे नगर परिसरातील कोपर्डेकर हायस्कूलच्यासमोर असणाऱ्या मैदानामध्ये तरुणाचा भोसकून खून करण्यात आला. संकेत पाटील (वय २० रा. वाल्मिकी वसाहत परिसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. वाल्मिकी परिसरात राहणारा संकेत पाटील हा युवक शाहूपुरी मधील एका गॅरेजमध्ये कामाला आहे. शनिवारी रात्री कोपर्डेकर हायस्कूलच्या समोर असणाऱ्या मैदानामध्ये त्याचा भोकसून खून… Continue reading साळोखे नगर परिसरात तरुणाचा भोसकून खून

पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड

पुणे (प्रतिनिधी) : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातल्या ​सत्तासंग्रामाला शनिवारीही हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तोडफोड केली. तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर काही लोकांनी हल्ला केला होता. अहमदनगरमध्ये बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या… Continue reading पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड

कागलनजीक दोघांकडून २ किलो गांजा जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल-मुरगूड रस्त्यावरील शाहू साखर कारखान्यानजीक शेती कार्यालयाजवळ गांजा विकण्यासाठी आलेल्या दोघांना पकडून त्यांच्याकडून २ किलो गांजा व इतर साहित्य असा मिळून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक फौजदार विजय गुरखे व पोलीस महेश गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई केली.… Continue reading कागलनजीक दोघांकडून २ किलो गांजा जप्त

कोल्हापुरात ५०० रुपयांच्या १४८ बनावट नोटा जप्त : एकाला अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज कोल्हापूर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बनावट नोटा बाळगणाऱ्याला अटक केली. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या नोटांसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या एकुण ७४ हजार रुपयांच्या १४८ बनावट नोटा जप्त केल्या. आज पथकातील पोलीस अमंलदार ओंकार परब यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, प्रमोद पुंडलीक मुळीक (वय ३१, रा. मजरे शिरगांव, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याच्याकडे बनावट नोटा… Continue reading कोल्हापुरात ५०० रुपयांच्या १४८ बनावट नोटा जप्त : एकाला अटक

बिष्णोई टोळीतील एकाला कोल्हापूरात अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील बिष्णोई टोळीतील एका गुंडाला कोल्हापूरात अटक करण्यात आली. मोहित उर्फ शेराजगबीरसिंग मलीक असे त्याचे नाव असून त्याला रंकाळा पदपथ उद्यान येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून पकडले. मलिक याच्यावर विविध ठिकाणी खून, खंडणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल असून तो चार महिने फरारी होता. मलिक… Continue reading बिष्णोई टोळीतील एकाला कोल्हापूरात अटक…

मुमेवाडी येथे पंजाबच्या दरोड्यातील चौघेजण जेरबंद

आजरा (प्रतिनिधी) : पंजाबमध्ये जमीन खरेदी-विक्री व्यवसायातून झालेल्या वादादरम्यान एका कार्यालयावर हल्ला करीत एका व्यक्तीवर बंदुकीने गोळ्या घालणाऱ्या आणि सुमारे एक कोटी रुपयांचा दरोडा टाकलेल्या टोळीमधील चौघा जणांना आजरा पोलिसांनी धाडसाने पकडले. हे चौघे आरोपी एका अलिशान गाडीमधून गोव्याला पळून जात असताना रविवारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर संबंधित चौघांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात… Continue reading मुमेवाडी येथे पंजाबच्या दरोड्यातील चौघेजण जेरबंद

गौरवाड येथे मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : वाळू उपसा करण्यासाठी बंदी असताना गौरवाड, ता. शिरोळ येथील पाणवठ्याजवळ शासकीय सुट्टीचा फायदा उचलत गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळेस लाखो रुपयांची वाळूची चोरी झाली आहे. या चोरीच्या वाळूचा डेपो कवठेगुलंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. ही चोरी काही माजी ग्रा.पं सदस्यांनी केल्याची चर्चा आहे. गौण खनिज चोरी करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार… Continue reading गौरवाड येथे मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी

error: Content is protected !!