कोल्हापूर (प्रतिनधी) : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर शिवसैनिक संतप्त झाले आहेत. राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवलेसह दहा जणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रणजीत जाधव यांनी दिली आहे.

याप्रकरणी राजेंद्र जाधव, गुप्तजित मोहिते, शैलेश हिरासकर, राकेश माने आणि चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिवसेनेत दुफळी पडली असून याचे पडसाद कोल्हापूरात बघायला मिळत आहेत.