कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज कोल्हापूर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बनावट नोटा बाळगणाऱ्याला अटक केली. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या नोटांसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या एकुण ७४ हजार रुपयांच्या १४८ बनावट नोटा जप्त केल्या.

आज पथकातील पोलीस अमंलदार ओंकार परब यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, प्रमोद पुंडलीक मुळीक (वय ३१, रा. मजरे शिरगांव, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याच्याकडे बनावट नोटा असून या नोटा घेवून तो कोल्हापूरातील शिवाजी पार्क परिसरातील चिंतामणी अपार्टमेंटजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलीसांनी चिंतामणी अपार्टमेंट जवळ सापळा लावून प्रमोद याला अटक केली. तसेच त्याच्याकडून ५०० रूपयांच्या १४८ बनावट नोटांसह एकुण ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, सुनिल कवळेकर, अमोल कोळेकर, अजय वाडेकर, वसंत पिंगळे, संदीप कुंभार, नितीन चोथे, तुकाराम राजीगरे, सागर कांडगांवे, संजय पडवळ, संतोष पाटील, अनिल जाधव, सचिन बेंडखेळे यांनी केली.