पन्हाळगडावर मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले : सीसीटिव्हीचा अभाव

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळगड येथील वारे बुरूज परिसरातून रविवारी दुपारच्या सुमारास हिरो होंडा स्प्लेंडर क्र. (एमएच १० एके ७२४) चोरीला गेली. ही मोटरसायकल अमित कदम (रा. नागांव. ता. हातकणंगले) यांची असून ते पन्हाळगड फिरण्यासाठी मित्रांसोबत आले होते. कदम हे सज्जाकोठी पाहून झाल्यानंतर ते वारे बुरूज परिसरात गेले होते. यावेळी बुरुजाच्या बाहेर त्यांनी गाडी उभी केली… Continue reading पन्हाळगडावर मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले : सीसीटिव्हीचा अभाव

विक्रमनगरमधील चोरी प्रकरणी १२ तासांत दोघे जेरबंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विक्रमनगर येथील खुशबू सराफ दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना अवघ्या १२ तासांत राजारामपुरी पोलिसांनी जेरबंद केले. सचिन शिवाजी आगलावे (वय २१) आणि साहिल चाँदसाहब गवंडी (वय २५ रा. दोघेही विक्रमनगर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी साहील युसूफ पठाण… Continue reading विक्रमनगरमधील चोरी प्रकरणी १२ तासांत दोघे जेरबंद

प्राथमिक शिक्षक सेवकाच्या पतसंस्थेत १.५८ कोटीचा अपहार

कुंभोज (प्रतिनिधी) : हातकणंगले येथील तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांच्या सहकारी पतसंस्थेत तत्कालीन चेअरमन, सचिव आणि शाखाधिकारी यांनी १ कोटी ५८ लाखांपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याचे शासकीय लेखा परीक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. तत्कालीन चेअरमन, सचिव, आणि कर्मचारी अशा १० जणांविरुद्ध शासकीय लेखा परीक्षक सुभाष देशमुख यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हातकणंगले तालुका प्राथमिक… Continue reading प्राथमिक शिक्षक सेवकाच्या पतसंस्थेत १.५८ कोटीचा अपहार

विक्रमनगरमध्ये दुकानातून २ लाखांचे दागिने लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विक्रमनगर येथील खुशबू सराफ दुकानाच्या शटरची दोन्ही कुलपे तोडून चोरट्याने रोख ४०० रुपयांसह २ लाख १० हजारांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी साहिल युसूफ पठाण (वय ३२, रा. टेंबलाई टेकडी विक्रमनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तातडीने घटनास्थळी शहर उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे… Continue reading विक्रमनगरमध्ये दुकानातून २ लाखांचे दागिने लंपास

ऑनलाईन माध्यमातून चार महिला आमदारांना गंडा

पुणे (प्रतिनिधी) : ‘आई आजारी आहे’, असे सांगून एका भामट्याने राज्यातील चार महिला आमदारांनाच गंडा घातला असून, या प्रकरणी आता पुण्यात पोलिसांनी मुकेश राठोड या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत आपण सर्वसामान्यांची ऑनलाइन बसूनच झाल्याचे ऐकले असेल, मात्र आता राज्यातल्या चार महिला आमदारांची फसवणूक करत त्यांच्याकडून पैसे उकळल्याची प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाईन माध्यमातून… Continue reading ऑनलाईन माध्यमातून चार महिला आमदारांना गंडा

एवन कॉलनीमध्ये बंद घर फोडून सहा लाखांचा मुद्देमाल लंपास…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील नवा वाशी नाका परिसरात असणाऱ्या एवन कॉलनीतील अमर विकास सोसायटीमधील बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा चोरट्यांनी उचकटला. यावेळी रोख रक्कम ७० हजारांसह सोन्याचे दागिने असा ६ लाखांच्या मुद्देमालावंर चोरट्यानं डल्ला मारला आहे. या घटनेची नोंद आज करवीर पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी आनंदा मशाप्पा कांबळे (रा. एवन काँलनी, नवा वाशी नाका, कोल्हापूर)… Continue reading एवन कॉलनीमध्ये बंद घर फोडून सहा लाखांचा मुद्देमाल लंपास…

व्हिक्टोरिया पुलावर उत्खनन; कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा

आजरा (प्रतिनिधी) : येथील पुरातन असलेल्या व्हिक्टोरिया पुलावर एप्रिल महिन्यात कंत्राटदाराने दुरुस्तीच्या नावाखाली पुलावर उत्खनन केले आहे. मोठे खड्डे पडल्यामुळे या पुलास धोका पोहोचला आहे. अनेक वाहने खड्डयात अडकल्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. या खड्ड्यातून पाणी मुरल्याने पुलास धोका निर्माण झाला आहे. अशा बेजबाबदार कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आजरा तहसीलदार यांच्याकडे मनसेतर्फे… Continue reading व्हिक्टोरिया पुलावर उत्खनन; कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा

कोल्हापुरात दुचाकी चोरट्यास अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील ताराराणी गार्डननजीक एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरलेल्या तीन दुचाकी जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. उमेश वसंतराव एटाळे (वय ४८, रा. कुरणे गल्ली, यादवनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या तीन दुचाकींची अंदाजे किंमत ५० हजार रुपये इतकी आहे. कोल्हापुरातील जुना राजवाडा, शाहूपुरी आणि कराड (जि.… Continue reading कोल्हापुरात दुचाकी चोरट्यास अटक

मलकापुरातील तिघांकडून ७.५० लाखांचे दागिने जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना पकडून त्यांच्याकडून १५५ ग्रॅम वजनाचे ७.५० लाख रुपाये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. समर्थ मच्छिंद्र भोपळे (वय २२), राकेश सदाशिव पाटील (वय २३) व स्वप्नील शिवाजी भोपळे (वय २६, तिघेही रा. सणगर गल्ली, मलकापूर, ता. शाहूवाडी) अशी… Continue reading मलकापुरातील तिघांकडून ७.५० लाखांचे दागिने जप्त

कळे येथे दोन कुटुंबात मारामारी : आठजण जखमी

कळे (प्रतिनिधी) : कळे येथे घरासमोरील मोकळी जागा देवस्थान समितीकडून ये-जा करण्यासाठी भुईभाड्याने घेतलेली वाट बंद केली. या कारणावरून काठ्या आणि लोखंडी सळीने दोन कुटुंबात मारामारी झाली. यामध्ये दोन्ही कुटुंबातील एकूण आठजण जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या कोल्हापूर-बाजारभोगाव रोडवर असणाऱ्या महाराष्ट्र देवस्थान समितीची… Continue reading कळे येथे दोन कुटुंबात मारामारी : आठजण जखमी

error: Content is protected !!