गोकुळ बिनविरोधाची बोलणी फिस्कटण्यास आहेत ‘ही’ कारणे…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्तारूढ आघाडी बरोबर चर्चा करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली होती. त्यानुसार मुंबई आणि कोल्हापुरात बैठकाही झाल्या. पण चर्चेदरम्यान दोन्हीकडून एकमेकांबद्दल अविश्वासाचे वातावरण आणि सत्तारुढ आघाडीची विरोधकाना नगण्य जागा देऊन बोळवण करण्याची मानसिकता यामुळेच बिनविरोधाची बोलणी फिस्कटली, असे विरोधी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील… Continue reading गोकुळ बिनविरोधाची बोलणी फिस्कटण्यास आहेत ‘ही’ कारणे…

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ५१ जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ५१ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आज (सोमवार) दिवसभरात ४२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४१६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २७, हातकणंगले तालुक्यातील ५, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, पन्हाळा… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ५१ जणांना कोरोनाची लागण

बांबवडेत तरुणाला आत्महत्येपासून रोखले पण..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे आज (सोमवार) इमारतीवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी वाचवले. दरम्यान, याच तरुणाने रानात जाऊन झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आज घडला. गणेश यशवंत चव्हाण (वय २४, रा. खुटाळवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाला दारूचे व्यसन असून त्याने आज दुपारी बांबवडे येथील एका इमारतीवर… Continue reading बांबवडेत तरुणाला आत्महत्येपासून रोखले पण..!

यावर्षी पाणी टंचाई भासणार नाही : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

जयसिंगपूर (प्रतिनिधी) : एप्रिल आणि मे महिन्यामध्ये असणाऱ्या  कडक उन्हाळ्यामुळे नद्यांमधील पाण्याची आवक कमी होते. तर उपशाचे प्रमाण अधिक असल्यामुळे कृष्णा, वारणा नद्यांची पात्रे कोरडी पडतात. परिणामी शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी  आत्तापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करावे. असे आदेश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. ना. यड्रावकर म्हणाले… Continue reading यावर्षी पाणी टंचाई भासणार नाही : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

सराईत दोन मोटरसायकल चोर जेरबंद (व्हिडिओ)

कोल्हापुरात सराईत दोघा मोटरसायकल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून ४ लाख ५० हजारांच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

आरटीओमधील पंटरांचा बंदोबस्त करावा : अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील आरटीओ कार्यालय परिसरात  ठिय्या मांडून बसलेल्या पंटरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारीस यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आरटीओ कार्यालय हे वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत येत असते. त्यामध्ये कार्यालयात पंटरांचा वावर होत आहे.… Continue reading आरटीओमधील पंटरांचा बंदोबस्त करावा : अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी शिवसेना कटिबद्ध : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासह येथील प्राचीन मंदिराचा विकास करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून प्राचीन मंदीरांचे अस्तित्व कमी होत आहे. असे निवेदन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीने आज (सोमवार) राजेश क्षीरसागर यांना दिले. राजेश क्षीरसागर म्हणाले की,… Continue reading विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी शिवसेना कटिबद्ध : राजेश क्षीरसागर

कोल्हापुरात २८ मार्चला ‘गगन दमामा बाज्यो’ नाटकाचा प्रयोग…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काफिला थिएटर्स आणि महालक्ष्मी सिने सर्व्हिसेस यांच्यातर्फे ‘गगन दमामा बाज्यो’ हे दोन अंकी नाटक २८ मार्चला प्रथमच सादर होत आहे. शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारलेले हे नाटक आहे. हिंदीतील ख्यातनाम लेखक पियुष मिश्रा यांनी हे नाटक लिहिले आहे. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून रविवार (दि.२८) मार्च रोजी केशवराव… Continue reading कोल्हापुरात २८ मार्चला ‘गगन दमामा बाज्यो’ नाटकाचा प्रयोग…

आजरा तालुक्यात ६ जणांना कोरोनाची लागण…

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यात आज (सोमवार) ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुन्हा परिस्थिती धोक्याबाहेर जात आहे. नागरिकांनी नियमांचे पालन कडक केले नाही तर पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये आजरा शहरातील २ जण बाधित असून सर्वोदय नगर मधील ४७ वर्षीय पुरुष आणि ३६ वर्षीय स्त्रीचा समावेश आहे. तर तालुक्यातील… Continue reading आजरा तालुक्यात ६ जणांना कोरोनाची लागण…

इचलकरंजीत भटक्या श्वानांचा धुमाकूळ…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरात भटक्या श्वानांनी धुमाकूळ घातला आहे. आज (सोमवार) शहरातील लायकर गल्ली, धान्य ओळ या परिसरात भटक्या श्वानांनी शारदा फाटक, स्वप्नाली गोलंगडे आणि सुभाष माने यांच्यावर हल्ला करुन जखमी केले. यांच्यावर आयजीएम, तर अन्य तिघांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इचलकरंजीमध्ये अनेक ठिकाणी भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला असून, यासंदर्भात विविध सामाजिक… Continue reading इचलकरंजीत भटक्या श्वानांचा धुमाकूळ…

error: Content is protected !!