इचलकरंजीत जलवाहिनीला गळती : रस्त्यावरती वीस फुटांचा कारंजा

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या आणि गळतीमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या कृष्णा पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला इचलकरंजी-टाकवडे मार्गावर व्हॉल्वलाच गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. हा व्हॉल्व तुटल्याने रस्त्यावरती सुमारे २० फुटांचा कारंजा उडत होता. यामुळे पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. सध्या उन्हाळा सुरु असून त्यातच टाकवडे वेस… Continue reading इचलकरंजीत जलवाहिनीला गळती : रस्त्यावरती वीस फुटांचा कारंजा

अखेर गोकुळ निवडणुकीची तारीख ठरली..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि जिल्हाचे राजकारण, अर्थकारण अवलंबून असणाऱ्या गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २ मे २०२१ रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे २५ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. याची घोषणा… Continue reading अखेर गोकुळ निवडणुकीची तारीख ठरली..!

आर. के. नगरातील बंद पोलीस चौकी पुन्हा सुरू करावी : शिवसेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील आर.के.नगर येथील बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात यावी. अशी मागणी आज (मंगळवार) जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन उपजिल्हा प्रमुख महिला संघटीका स्मिता सावंत आणि शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहरातील उपनगरामध्ये चोरी, मारामारीसह विविध प्रकारच्या घटना घडत… Continue reading आर. के. नगरातील बंद पोलीस चौकी पुन्हा सुरू करावी : शिवसेनेची मागणी

करवीर कामगार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास योजनेची इचलकरंजी शहरात अंमलबजावणी करण्यात यावी. या मागणीसाठी आज (मंगळवार) करवीर कामगार (आयटक) संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी इचलकरंजी शहरातील नागरिकांना शहापूर येथे घरकुलासाठी गट नं. ४६८ जागेला मंजूरी मिळावी. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. परंतु, त्याला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेची… Continue reading करवीर कामगार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

शिवाजी विद्यापीठ परिसरात मधमाशांचा नागरीकांना त्रास…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठ परिसरात झाडांवर मधमाशांची अनेक पोळी आहेत. या पोळ्यातील मध खाण्यासाठी काही पक्षी या पोळ्यांकडे येतात. त्यामुळे मधमाशा चवताळून या परिसरात फिरायला येणाऱ्या लोकांना चावतात. आजही काहीजणांना मधमाशा चावल्या. प्रशासनाने यावर तोडगा काढावा अशी मागणी नागरीकांतून व्यक्त होत आहे. विद्यपीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूच्या झाडांवर मधमाशांची अनेक… Continue reading शिवाजी विद्यापीठ परिसरात मधमाशांचा नागरीकांना त्रास…

कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळू-लॉकडाऊन टाळू : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे आज (मंगळवार) बैठक घेण्यात आली. यामध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि सर्व संलग्न संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही मोहीम कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व संलग्न… Continue reading कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळू-लॉकडाऊन टाळू : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गडहिंग्लजमध्ये भाजपाची निदर्शने…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याकडे १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. असा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे राज्याची सगळीकडे बदनामी झाली असून गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी गडहिंग्लज भाजपने केली आहे. तसेच यावेळी गृहमंत्री देशमुख यांच्या विरोधात प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेही केली. गृहमंत्री अनिल देशमुख… Continue reading गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गडहिंग्लजमध्ये भाजपाची निदर्शने…

शिरोळ तालुक्यातील ‘हा’ प्रेमवीर कोण..?

शिरोळ (प्रतिनिधी) : युद्धात आणि प्रेमात सगळे माफ असे ब्रिदवाक्य ठरलेच आहे. याचीच प्रचिती शिरोळ तालुक्यात आली आहे. धरणगुत्ती ते जयसिंगपूर या अडीच किलोमीटर मार्गावर एका प्रेमवीराने ‘आय लव्ह यू’ आणि ‘आय मिस यू’ असे ऑईलपेंटने रस्त्यावरच रेखाटले आहे. आता हा प्रेमवीर कोण याची चर्चा तालुक्यात जोरदार सुरु आहे. शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती गावात प्रेमाचा अगळा… Continue reading शिरोळ तालुक्यातील ‘हा’ प्रेमवीर कोण..?

शिरोळ तालुक्यातील २६५ पूरग्रस्तांना २ कोटी २५ लाखांचा मिळणार लाभ…

जयसिंगपूर (प्रतिनिधी) : जुलै २०१९ मध्ये आलेल्या महापूरामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. यातील बहुतांशी शेतकऱ्यांना पीक नुकसानीची रक्कम तर काहींना पीककर्ज माफी मिळाली होती. तर यामधील काही शेतकऱ्यांचे उशिरा झालेले पंचनामे आणि संबंधित बँकांच्या चुकीच्या माहितीमुळे शिरोळसह जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते.   याबाबतचा विस्तृत अहवाल जिल्हा लेखापरीक्षण आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने… Continue reading शिरोळ तालुक्यातील २६५ पूरग्रस्तांना २ कोटी २५ लाखांचा मिळणार लाभ…

गोकुळमध्ये महाडिक, पी एन विरोधात एकवटले सर्व ‘मातब्बर’ नेते…

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : कोल्हापुरात गोकुळ निवडणुकीचे वातावरण तापले आहे. विरोधी आघाडीत बघता बघता तीन मंत्री, दोन खासदार, चार आमदार, दोन माजी आमदार आणि एक माजी खासदार एवढ्या मोठ्या प्रमाणात ताकत एकवटली आहे. यामुळे गोकुळच्या निवडणुकीत आता सत्ताधाऱ्यांची काय रणनीती असणार आहे हेच पहावे लागेल. पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘आपलं ठरलय’ असा नारा दिला आणि… Continue reading गोकुळमध्ये महाडिक, पी एन विरोधात एकवटले सर्व ‘मातब्बर’ नेते…

error: Content is protected !!