…तर संभाजीराजेंची माफी मागतो ; आम्ही शेण खाल्लं असेल, आता तुम्ही का खाताय ? : उद्धव ठाकरे

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती तर महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक निवडणूक लढवत आहेत. तर उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन्हीकडून जंगी सभा घेतल्या जात आहेत. महायुतीने संजय मंडलिक यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी 27 एप्रिलला जंगी सभा घेतली होती. तर महाविकास आघाडीने काल बुधवारी (1… Continue reading …तर संभाजीराजेंची माफी मागतो ; आम्ही शेण खाल्लं असेल, आता तुम्ही का खाताय ? : उद्धव ठाकरे

कुरुंदवाड शहरात प्रत्येक घराघरात खासदार धैर्यशील माने जोरात : कार्यकर्ते लागले कामाला

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : गोरगरीब जनतेसाठी तळमळीने काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या विकासाचे प्रतीक आहेत. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे हे आमचे देखील स्वप्न आहे. त्यासाठीच आपण महायुतीचा आघाडीधर्म पाळत धैर्यशील माने यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम राहून माने यांना उच्चांकी मतांनी निवडून आणू .असा विश्वास कुरूंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, दादासो पाटील,जवाहर पाटील,धनपाल आलासे, रमेश… Continue reading कुरुंदवाड शहरात प्रत्येक घराघरात खासदार धैर्यशील माने जोरात : कार्यकर्ते लागले कामाला

शाहू महाराजांच्या आडून तयार होत असलेल्या नव्या महाराजाला थांबवा – पी.जी. शिंदे

पी.जी. शिंदे यांचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र वेतवडे, (प्रतिनिधी ) ; कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीला एक वेगळी धार चढत आहे. या निवडणुकीत शाहू महाराज छत्रपती यांच्या आडून एक नवा महाराज तयार होत आहे त्याला थांबवा, अशी टीका भाजपचे नेते पी. जी. शिंदे यांनी केली. हा कुटील महाराज तालुक्याला लाचारी करायला लावणारा, कुटुंबांना वेठीस धरणारा,… Continue reading शाहू महाराजांच्या आडून तयार होत असलेल्या नव्या महाराजाला थांबवा – पी.जी. शिंदे

खासदार धैर्यशील माने एक लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार : रामचंद्र डांगे

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांनी 8 हजार 200 कोटींची विकास कामे केली आहेत. या मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणात विकासकामे करणारे धैर्यशील माने यांना मतदार यावेळेस एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून देतील. असा विश्वास भाजपाचे रामचंद्र डांगे यांनी माने यांच्या प्रचारार्थ भैरेवाडी येथे व्यक्त केला. यावेळी घरोघरी जात प्रचार पत्रके वाटून… Continue reading खासदार धैर्यशील माने एक लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार : रामचंद्र डांगे

कोल्हापुरात महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण..!

कोल्हापूर, (प्रतिनिधी ) – कोल्हापुरात महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त उपस्थित वीरपत्नी, अधिकारी, नागरीक व जनतेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संचलन करण्यात आले. पोलीस बँड पथकाच्या निनादात पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांना सलामी देण्यात आली. यामध्ये पोलीस विभागाचे पथक,… Continue reading कोल्हापुरात महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण..!

विकासाभिमुख खासदाराला पुन्हा खासदार करण्यासाठी जनता समर्थपणे साथ देईल -डॉ. श्रीकांत शिंदे

इचलकरंजी, (प्रतिनिधी ) : कोरोनाच्या काळात खंड पडला असतानाही उरलेल्या दोन वर्षात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.मतदारसंघात विविध विकास कामासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून 8 हजार 200 कोटी तर चंदुर गावासाठी 23 कोटी 12 लाख 28 हजार रुपयांचा निधी खासदार धैर्यशील माने… Continue reading विकासाभिमुख खासदाराला पुन्हा खासदार करण्यासाठी जनता समर्थपणे साथ देईल -डॉ. श्रीकांत शिंदे

धैर्यशील माने यांना शाहूवाडी विधानसभेतून मोठे मताधिक्य देणार -आमदार डॉ.विनय कोरे

धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ चरण येथे जाहीर सभा बांबवडे (प्रतिनिधी ) – धैर्यशील माने यांना शाहूवाडी विधानसभेतून मोठे मताधिक्य देऊन निवडून देऊया असे आवाहन आमदार विनय कोरे यांनी शाहुवाडी तालुक्यातील चरण येथील जाहीर सभेमध्ये केले विरोधकांकडून निर्माण केलेल्या भूलथापांना बळी न पडता पूर्णपणे ताकतीने धैर्यशील माने यांचा प्रचार करून धनुष्यबाण चिन्ह घराघरापर्यंत पोचवा असे आवाहन… Continue reading धैर्यशील माने यांना शाहूवाडी विधानसभेतून मोठे मताधिक्य देणार -आमदार डॉ.विनय कोरे

महाराज जरा लक्ष ठेवा नाहीतर वटमुखत्यार वाड्यावर नाव लावतील ; सत्यजीत कदम यांची बोचरी टीका..!

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : शाहू महाराज छत्रपती आपल्याविषयी सर्वांनाच आदर आहे, पण आपले स्वयंघोषित वटमुखत्यार घेतलेल्यांचे अंतरंग आपल्याला माहित दिसत नाही. यापुढे आपण स्वतः जनतेतून निवडून येत नाही , याची पूर्ण कल्पना असल्यामुळे त्यांनी चाव्या फिरवून काँग्रेसच्या उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात घातली. राजकीय सुळावर आपल्याला चढविले. या पाताळयंत्री माणसावर जरा लक्ष ठेवा , नाहीतर कधी… Continue reading महाराज जरा लक्ष ठेवा नाहीतर वटमुखत्यार वाड्यावर नाव लावतील ; सत्यजीत कदम यांची बोचरी टीका..!

विरोधी उमेदवारांनी आता तरी अजिंक्यतारावरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी : संजय मंडलिक

बानगेसह म्हाकवे, मळगे बुद्रुक, बिद्री येथील सभांना उस्फूर्त प्रतिसाद बानगे, (प्रतिनिधी ) – विरोधकांनी आता तरी अजिंक्यतारा वरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी. रोज तेच तेच मुद्दे वाचून दाखवून त्यांनाही कंटाळा आला असावा. असा टोला महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी लगावला. कागल तालुक्यातील बाणगेसह म्हाकवे, मळगे बुद्रुक, बिद्री येथे आयोजित जाहीर प्रचार सभांमध्ये प्रा. मंडलिक बोलत… Continue reading विरोधी उमेदवारांनी आता तरी अजिंक्यतारावरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी : संजय मंडलिक

दत्तक विधान झालेल्या वाड्याचाही बाजार केल्याचा जमादार यांचा गंभीर आरोप..!

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : आजवर मुंबई ,बेंगलोर ,कोल्हापूरसह कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता विकल्या गेल्या आहेत, गादीचे वारसदार असल्याचे सांगणाऱ्यांनी अगदी दत्तक विधान झालेल्या वाड्याची मालमत्ताही विकून खाल्ल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी केला आहे. लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मुरगूड येथे बोलत होते. राजे राजवर्धन कदमबांडे यांनी पत्रकार परिषद… Continue reading दत्तक विधान झालेल्या वाड्याचाही बाजार केल्याचा जमादार यांचा गंभीर आरोप..!

error: Content is protected !!