मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. मनीषा भोजकर

कुंभोज (प्रतिनिधी) : शिवाजीराव देशमुख व्याख्यानमाला अंतर्गत आम्ही सावित्रीच्या लेकी ” या विषयावर नरंदे हायस्कूल येथे मुलींसाठी किशोरवयाचा कालावधी खूप महत्वाचा असतो. या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले या वेळी मुलींचे उमलते वय, त्यामध्ये येणारे विचार, स्वतःला आत्मनियंत्रित कसे ठेवावे तसेच मुलींसाठी संतुलित आहार, दररोज व्यायाम,  नियमित अभ्यास करून, आपल्या आईवडिलांना मदत करून स्वतः कडे लक्ष… Continue reading मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. मनीषा भोजकर

राज्यस्तरीय रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्काराने किरण सुतार सन्मानित.

कळे (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव येथील किरण दिपक सुतार यांना डिजीटल शैक्षणिक दैनिक रयतेचा कैवारी यांच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार बापुसाहेब डी.डी.विसपुते महाविद्यालय विचुंबे, ता.पनवेल, जि.रायगड येथे आदर्श शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष डी.डी.विसपुते यांचे हस्ते प्रधान करण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी केंद्रशाळा येथे प्राथमिक शिक्षक व प्रभारी केंद्र प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या… Continue reading राज्यस्तरीय रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्काराने किरण सुतार सन्मानित.

‘स्तुति’ प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभागींसाठी पन्हाळा सहल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात स्तुति अंतर्गत चालू असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पाचव्या दिवशी दोन मार्गदर्शनपर व्याख्यानानंतर सहभागींना किल्ले पन्हाळाची शैक्षणिक सहल घडविण्यात आली. पहिल्या सत्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रा. राजाराम माने यांनी ‘नॅनोस्ट्रक्चर आणि त्यांचे उपयोग’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. राजेंद्र सोनकवडे यांनी प्रा. माने यांचा सत्कार केला. दुसऱ्या सत्रात शिवाजी… Continue reading ‘स्तुति’ प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभागींसाठी पन्हाळा सहल

सांगलीतील शैक्षणिक अधिवेशनाचे राजू शेट्टी यांना निमंत्रण

शिरोळ (प्रतिनिधी) :सांगली येथे होणाऱ्या शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे निमंत्रण माजी खासदार राजू शेट्टी यांना देण्यात आले आहे. महामंडळाच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एन. डी. बिरनाळे, प्रा. एम. एस. रजपूत व विनोद पाटोळे यांनी शिरोळ येथील राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन हे निमंत्रण दिले. शिक्षण संस्थांनी महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकरी… Continue reading सांगलीतील शैक्षणिक अधिवेशनाचे राजू शेट्टी यांना निमंत्रण

‘स्तुति’च्या प्रशिक्षण कार्यक्रमात ‘एनसीएल’च्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात स्तुति अंतर्गत चालू असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे दोन शास्त्रज्ञ उपस्थित होते. त्यांनी सहभागींना अतिशय उपयोगी असणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांविषयी सविस्तर माहिती दिली. पहिल्या सत्रात डॉ. सी. गोपीनाथ यांनी फोटो ‘इलेक्ट्रॉन एमिशन’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. संजय चव्हाण यांनी डॉ. गोपीनाथ यांचा सत्कार केला. दुसऱ्या सत्रात पुण्याच्या… Continue reading ‘स्तुति’च्या प्रशिक्षण कार्यक्रमात ‘एनसीएल’च्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

आता गृहपाठाला मिळणार सुट्टी ?

पुणे (प्रतिनिधी) : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. लवकरच तज्ज्ञांशी चर्चा करुन गृहपाठ बंदीवर निर्णय घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. केसरकर म्हणाले, माझे वैयक्तिक मत आहे की, मुलांवर अभ्यासाचे ओझे देऊ नये. मुलांच्या मेंदूचा विकास… Continue reading आता गृहपाठाला मिळणार सुट्टी ?

सशक्त राष्ट्र उभारणीत जनजातींचे योगदान : वंदना केंगले-साबळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राष्ट्र सशक्त आणि समर्थपणे उभे राहण्यामध्ये जनजाती समाजाचे मोठे योगदान आहे. या समाजातील अनेक शुरवीर महापुरूषांनी देशासाठी प्राणांची आहुती दिलेली आहे. जनजाती समाज स्वातंत्र्य युध्दामध्ये सर्व शक्तीनिशी लढला होता, हा इतिहास आहे, असे प्रतिपादन पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या वंदना केंगले-साबळे यांनी केले. राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग, केंद्र सरकार आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या… Continue reading सशक्त राष्ट्र उभारणीत जनजातींचे योगदान : वंदना केंगले-साबळे

नीट परीक्षेत सारा जाधव जिल्ह्यात प्रथम

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ-सावर्डे येथील सारा अभय जाधव हिने नीट परीक्षेत ६८० गुण प्राप्त करून कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. देशातील सर्वोच्य वैधकीय शिक्षण संस्था एम्स येथे तिची प्रवेशासाठी निवड झाली. ती संजय घोडावत मेडिकल ॲकॅडमीची विद्यार्थ्यांनी आहे. या यशाबद्दल तिचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यासाठी तिला प्रा. गुप्ता. डॉ. अनुजा… Continue reading नीट परीक्षेत सारा जाधव जिल्ह्यात प्रथम

विद्यापीठांमधील विद्यार्थी निवडणुका सुरू व्हाव्यात: केंद्रीय मंत्री बघेल

पुणे (प्रतिनिधी) : विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांमधील स्थगित असलेल्या विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत. देशातील सद्यकालीन राजकीय प्रवाह एका स्थित्यंतरातून जात आहे. अशा परिस्थितीत राजकीय पटलावरील भावी युवा नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय छात्र संसद महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल, अशी अपेक्षा केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.… Continue reading विद्यापीठांमधील विद्यार्थी निवडणुका सुरू व्हाव्यात: केंद्रीय मंत्री बघेल

बांधकाम क्षेत्रात मटेरियल सायन्सचा अभ्यास अत्यावश्यक : हडकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा वेग प्रचंड असून, नवीन बांधकाम मटेरियल्स वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मटेरियल सायन्सचा अभ्यास अत्यावश्यक आहे, असे मत अभियंता प्रशांत हडकर यांनी व्यक्त केले. अभियंता दिनाचे औचित्य साधून तंत्रज्ञान अधिविभागात झालेल्या व्याख्यानात प्रमुख पाहुणे इंजिनिअर प्रशांत हडकर बोलत होते. अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ. पी. डी. पाटील व हडकर यांच्या… Continue reading बांधकाम क्षेत्रात मटेरियल सायन्सचा अभ्यास अत्यावश्यक : हडकर

error: Content is protected !!