बांधकाम क्षेत्रात मटेरियल सायन्सचा अभ्यास अत्यावश्यक : हडकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा वेग प्रचंड असून, नवीन बांधकाम मटेरियल्स वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मटेरियल सायन्सचा अभ्यास अत्यावश्यक आहे, असे मत अभियंता प्रशांत हडकर यांनी व्यक्त केले. अभियंता दिनाचे औचित्य साधून तंत्रज्ञान अधिविभागात झालेल्या व्याख्यानात प्रमुख पाहुणे इंजिनिअर प्रशांत हडकर बोलत होते. अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ. पी. डी. पाटील व हडकर यांच्या… Continue reading बांधकाम क्षेत्रात मटेरियल सायन्सचा अभ्यास अत्यावश्यक : हडकर

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये अभियंता दिन उत्साहात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल विभागाच्या वतीने अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा, वक्तृत्व, निबंध, समूह चर्चा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील जवळपास २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण केंद्र व कौशल्य विभाग संचालक डॉ. ए. एम. गुरव यांचे उद्योजकता प्रकल्प… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये अभियंता दिन उत्साहात

संशोधक विद्यार्थ्यांनी हाताळली अत्याधुनिक उपकरणे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात स्तुति अंतर्गत चालू असलेल्या आठवडी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत तिसऱ्या दिवशी जागतिक क्रमवारीतील पहिल्या दोन टक्के शास्त्रज्ञांपैकी असणारे तीन शास्त्रज्ञ एकाच मंचावर आले आणि एक अनोखी वेळ साधून आली. यावेळी प्रा. सी. डी. लोखंडे यांनी प्रा. के. एम. गरडकर यांचा सत्कार केला. दरवर्षी जागतिक क्रमवारीमध्ये सर्वोत्तम असे दोन टक्के शास्त्रज्ञांची निवड… Continue reading संशोधक विद्यार्थ्यांनी हाताळली अत्याधुनिक उपकरणे

पूजा माळी ‘वाडे एशिया’ पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर या महाविद्यालयाच्या यावर्षी पासआऊट झालेल्या बॅचची विद्यार्थिनी पूजा माळी हिला ‘वाडे एशिया बेस्ट स्टुडन्ट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आर्किटेक्चरच्या पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षातील ‘सस्टेनेबल गेटवे, तिलारी’ या डिझाइन थिसीससाठी तिला सदर पुरस्कार देण्यात आला आहे. महिला आर्किटेक्टस, आर्टिस्ट्स व डिझाइनर्स यांच्या कामाला… Continue reading पूजा माळी ‘वाडे एशिया’ पुरस्काराने सन्मानित

‘समाजशास्त्र शिकल्यास समाजाचे सक्रिय सेवक बनू शकतो’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘समाजशास्त्र शिकल्याने आपण समाजाचे सक्रिय सेवक बनू शकतो,’ असे मत प्रा. आनंद कुमार यांनी व्यक्त केले. समाजशास्त्र विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. विविध क्षेत्रातील जागतिकीकरण कसे झाले? तसेच जागतिकीकरणाचा समाजातील प्रत्येक घटकांवर कसा प्रभाव पडतो, यावर प्रकाश टाकला आणि याला जोडून अ-जागतिकीकरण संकल्पना काय आहे,… Continue reading ‘समाजशास्त्र शिकल्यास समाजाचे सक्रिय सेवक बनू शकतो’

‘नॅनोसायन्स’च्या ३ विद्यार्थिनींची विदेशात पीएच.डी. साठी निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी या अधिविभागातील तीन विद्यार्थिनींची युनायटेड किंगडम आणि दक्षिण कोरियातील विद्यापीठामध्ये उच्च विद्यावेतनासह मास्टर्स आणि पीएच.डी. साठी निवड झाली आहे. युनायटेड किंगडममधील युनिव्हर्सिटी ऑफ शेफफिल्ड (जागतिक क्रमवारी ९६) येथे वैष्णवी अशोक सावेकर (रा. राधानगरी) हिची सेमीकंडक्टर फोटोनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयामध्ये मास्टर्स (पदवीत्तर) अभ्यासक्रमासाठी निवड झाली… Continue reading ‘नॅनोसायन्स’च्या ३ विद्यार्थिनींची विदेशात पीएच.डी. साठी निवड

हॅकॅथॉनच्या संयोजनात प्रसाद दिवाण यांचे योगदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या नावीन्यपूर्ण उपक्रम कक्षाच्या वतीने युवा संशोधकांना चालना देण्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२०२२ चे आयोजन कोल्हापूरच्या केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले होते. या  हॅकॅथॉन संयोजन केंद्राच्या नोडल अधिकारीपदाची जबाबदारी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रसाद दिवाण यांनी पार पाडली. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन या उपक्रमाव्दारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांसमोर विविध समस्या वा प्रश्न मांडून… Continue reading हॅकॅथॉनच्या संयोजनात प्रसाद दिवाण यांचे योगदान

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दीडपट वाढ

मुंबई (प्रतिनिधी) : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, सामजिक प्रश्नांची जणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी या योजनेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत दीडपट म्हणजे ५ लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाचा उपयोग… Continue reading राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दीडपट वाढ

सैफ सेंटर संशोधक विद्यार्थ्यांसाठी बनले अनोखे केंद्र : प्रा. सोनकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सैफ सेंटर हे संशोधक विद्यार्थ्यांसाठी अनोखे केंद्र बनले असल्याचे प्रतिपादन प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी केले. शिवाजी विद्यापीठात स्तुति अंतर्गत चालू असलेल्या आठवडी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात बोलत होते. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सहभागी झालेल्या सर्व शिक्षक संशोधक विद्यार्थी यांना प्रथम सत्रात संजय घोडावत विद्यापीठाचे डॉ. संभाजी पवार यांनी सोलर सेल… Continue reading सैफ सेंटर संशोधक विद्यार्थ्यांसाठी बनले अनोखे केंद्र : प्रा. सोनकवडे

शिवाजी विद्यापीठामध्ये गुरुवारी कार्यशाळेचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, भारत सरकार आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत ‘स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनुसूचित जमातीच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान’ या विषयावर गुरुवार, दि. १५सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के हे भूषवणार आहेत, तर… Continue reading शिवाजी विद्यापीठामध्ये गुरुवारी कार्यशाळेचे आयोजन

error: Content is protected !!