कळे (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव येथील किरण दिपक सुतार यांना डिजीटल शैक्षणिक दैनिक रयतेचा कैवारी यांच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार बापुसाहेब डी.डी.विसपुते महाविद्यालय विचुंबे, ता.पनवेल, जि.रायगड येथे आदर्श शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष डी.डी.विसपुते यांचे हस्ते प्रधान करण्यात आला.

पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी केंद्रशाळा येथे प्राथमिक शिक्षक व प्रभारी केंद्र प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत कोल्हापूर जिल्हयातून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या कार्यक्रमास रमेश जाधव, निवास जाधव, राजेश बुवा, अमर लोकरे, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.